(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad News : शिवसेना आमदार बोरनारे यांच्या अडचणीत वाढ? मारहाणीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल
Aurangabad News : शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्याविरोधात आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी त्यांच्यावर संबंधित पीडित महिलेला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे.
Aurangabad News : औरंगाबादच्या (Aurangabad) वैजापूर (Vaijapur) येथील शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीच त्यांच्या विरोधात महिलेला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेच्या पुरवणी जबाबानंतर विनयभंगाचे कलम लावण्यात आले आहे.
भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याचा राग मनात धरून आमदार रमेश बोरनारे आणि इतरांनी एका महिलेस शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती. वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला होता. मात्र, पोलिसांनी राजकीय दबावाखाली विनयभंगाचे कलम लावले नसल्याचा आरोप होत होता. त्यामुळे पोलिसांवर टीका होत होती. अखेर पुरवणी जबाबानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता आमदार रमेश बोरनारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
प्रकरण काय?
संबंधित महिला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. यामुळं रमेश बोरणारे रमेश बोरनारे, त्यांची पत्नी, भाऊ आणि इतर नातेवाईकांना त्यांना मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलंय. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी रमेश बोरनारे यांच्यासह 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आमदाराच्या पीए यांनी भांडण सोडत असताना आपल्या जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून महिलेविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.
भाजपची टीका
मारहाणीच्या प्रकरणानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवरायांच्या महाराष्ट्रात वैजापूरचा शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांनी भाजपच्या कार्यक्रमाला का गेली? असं म्हणत महिलेला बेदम मारहाण केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Bogus Doctor : हिंगोलीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश, तीन क्लिनिकवर आरोग्य प्रशासनाची कारवाई
- अवैध रेती तस्करांनी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात बुडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha