Maharashtra Hingoli Crime News : पोलीस विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणीला 3.90 लाखांना गंडा
Maharashtra Hingoli Crime News : या प्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणीच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Hingoli Crime News: राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू असतानाच, हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) एका तरुणीची पोलीस विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीला पोलीस विभागात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून तीन लाख 90 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणीच्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजना तुकाराम पोटे (वय 21 वर्षे, शिक्षण एमए प्रथम वर्ष) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे.
रंजना पोटे हिला पोलीस होण्याची लहानपणापासून इच्छा आहे. त्यामुळे ती पोलीस भरतीचा सराव करायची. दरम्यान तिने औरंगाबाद येथील एकता अकॅडमी या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी ऍडमिशन घेतलं होतं. याचवेळी तिथे सेनगाव तालुक्यातील हाणकदरी येथील रहिवाशी असलेल्या नागोराव सुखदेव श्रीरामे यांच्यासोबत रंजना पोटेची ओळख झाली. तर श्रीरामे याने मी फॉरेस्टमध्ये नोकरीला आहे, असे सांगून तरुणीला पोलीस खात्यात नोकरीचे आमिष दाखवले.
दरम्यान, पोलीसमध्ये नोकरी लावण्यासाठी 4 लाख रुपये लागतील असे सांगून, नोकरीला लागल्यानंतर 50 हजार रुपये महिना पगार सुरू होईल, असे सांगून श्रीरामे याने मुलीचा विश्वास जिंकला. तसेच पुढे तिच्या कुटुंबीयांशी संपर्क करून दोनवेळा फोन पेवरून 90 हजार रुपये आणि उर्वरित रक्कम त्याने स्वतः बाळापूर येथे येऊन स्वीकारली. असे मुलीच्या कुटुंबीयांकडून एकूण तीन लाख 90 हजार रुपये घेतले. सुखदेव श्रीरामे याला पैसे दिल्यावर आपली पोलीस भरतीत नेमणूक होईल अशी रंजना पोटेला अपेक्षा होती. मात्र पोलिसमध्ये भरती न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे आपण दिलेले पैसे परत मागताच सुखदेव श्रीरामे गायब झाला. त्यामुळे तरुणी आणि कुटुंबीय त्याच्या गावाकडे गेले. त्यानंतर त्याच्यावर नरसी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचे कळाले. तसेच त्याने इतरांनाही फसविल्याचे उघड झाले.
Maharashtra Hingoli Crime News : अनेकांना फसवल्याची शक्यता
सुखदेव श्रीरामे विरोधात पोलिस विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रंजना पोटेसह त्याने यापूर्वी अनेकांना फसवले असल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याने आतापर्यंत किती लोकांना फसवले, त्यांच्याकडून आत्तापर्यंत किती रक्कम बळकावली आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. सोबतच अशी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांत याची माहिती देण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. त्यामुळे हा मोठा रॅकेट असण्याचा देखील अंदाज वर्तवला जात आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
Gram Panchayat Election: सरपंचपदासह अख्खी ग्रामपंचायत लिलावात विकली, आता प्रकरण न्यायालयात