Mumbai Crime : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई; 24 लाख रुपयांच्या कोकेनसह नायजेरियन नागरिकाला अटक
Mumbai Crime : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून नायजेरियन नागरिक रात्रीच्या वेळी ड्रग्जचा व्यवसाय करायचा.
Mumbai Crime News : मुंबई क्राईम ब्रँच अँटी नार्कोटिक सेल, वांद्रे युनिटने एका 32 वर्षीय परदेशी नागरिकाला अटक केली असून त्याच्याकडे 24 लाख रुपये किमतीचे 80 ग्रॅम कोकेन सापडले आहे.
नायजेरियन नागरिक रात्रीच्या वेळी ड्रग्जचा व्यवसाय करायचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून नायजेरियन नागरिक रात्रीच्या वेळी ड्रग्जचा व्यवसाय करायचा. इतर काही परदेशी नागरिकांच्या मदतीने ते परदेशातून अमली पदार्थ आणत होते, ज्याचा पोलीस तपास करत आहेत. चुकवुमा ओग्बोना न्वाके उर्फ राजकुमार असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मुंबईत राहत असून त्याला समताक्रूझ परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी राजकुमार मुंबई आणि उपनगरात खूप सक्रिय आहे.
गुन्हा दाखल
पोलिसांनी सांगितले की तो नायजेरीन नागरिकाच्या संपर्कात होता जिथून तो ड्रग्ज मिळवत होता. त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"आम्ही प्रयत्न करत आहोत"
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट करून एका आठवड्यात पोलिसांकडून करण्यात आलेल्या महत्वाच्या कामांची माहिती दिली आहे. संजय पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात 13 प्रकरणांमध्ये चार कोटी 82 लाख चार हजार 90 रूपये किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. तर गेल्या आठवड्यात गुटख्याची 24 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यामध्ये 213089 किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. "हा माझा कामाचा अहवाल आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत, नक्कीच अजून चांगले होऊ शकले असते. मी काही साप्ताहिक अपडेट्स शेअर करू शकलो नाही. कारण आम्ही शहरातील दैनंदिन समस्या हाताळण्यात व्यस्त आहोत. आम्ही निवडलेल्या प्राधान्यक्रमांमध्ये केलेल्या सर्वांचा अहवाल आम्ही देत ओहोत, असे संजय पांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या