Amravati Crime : उमेश कोल्हेंच्या हत्येतील मुख्य आरोपीला बलात्कारच्या गुन्ह्यात जेल, 'लव जिहाद' चा आरोप
Amravati Crime News : या प्रकरणात विवाहित महिलेच्या कुटुंबांनी लवजिहादचा आरोप केला होता.
![Amravati Crime : उमेश कोल्हेंच्या हत्येतील मुख्य आरोपीला बलात्कारच्या गुन्ह्यात जेल, 'लव जिहाद' चा आरोप maharashtra Amravati crime news main accused in the murder of Umesh Kolhe has been jailed on charges of rape and love jihad Amravati Crime : उमेश कोल्हेंच्या हत्येतील मुख्य आरोपीला बलात्कारच्या गुन्ह्यात जेल, 'लव जिहाद' चा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/06/33492c0482b2c1596f9132f56e0cd8751657068419_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amravati Crime News : उमेश कोल्हे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेला इरफान याला मध्यप्रदेश मधील इंदोर पोलिसांनी बलात्कारच्या गुन्ह्यात त्याला 19 दिवस जेल झाली आहे.
विवाहित महिलेच्या कुटुंबांचा लवजिहादचा आरोप
एका विवाहित महिलेला इरफान याच्या मित्राने आणि इरफानने पळवून आणले, तिला जबरदस्ती बुरखा घालून घरी डांबून ठेवले आणि जबरदस्तीने बलात्कार केला अशी पीडित महिलेने ऑगस्ट 2021 मध्ये इंदोर पोलिसात तक्रार दिली होती. तेव्हा पोलिसांनी इरफान आणि त्याचे तीन सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. या प्रकरणात त्यावेळी इंदोर येथील विवाहित महिलेच्या कुटुंबांनी लवजिहादचा आरोप केला होता, उमेश कोल्हे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेला इरफान याला मध्यप्रदेश मधील इंदोर पोलिसांनी बलात्कारच्या गुन्ह्यात त्याला 19 दिवस जेल झाली आहे.
काय आहे प्रकरण?
नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. आजच केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
Crime News : एकाला संपवण्यासाठी सहा जण जमले एकत्र, सिगारेट दिले नाही म्हणून मास्टरमाईंडचाच काढला काटा
Crime: आधी पत्नीला संपवलं, त्यांनतर तिनेच जीव दिल्याचा व्हाट्सअपला स्टेट्स ठेवला; पण पोलिसांच्या...
Chandrashekhar Guruji : चंद्रशेखर गुरुजींच्या दोन मारेकऱ्यांना अटक, हत्येमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं स्पष्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)