रेल्वेत मोबाईल चोरणारा सराईत चोरटा हातातील बेड्यांसह पळाला; नैसर्गिक विधीचं कारण सांगत पोलिसांच्या हातावर तुरी
Maharashtra Ratnagiri Crime News : रेल्वेत मोबाईल चोरणारा सराईत चोरटा हातातील बेड्यांसह पळाला. या प्रकरणाबाबत पोलिसांची भूमिका मात्र 'हाताची घडी तोंडावर बोट' अशीच.
Latest Ratnagiri Crime News : रेल्वेत मोबाईल चोरणारा (Mobile Thief) सराईत चोरटा हातातील बेड्यांसह पळाल्याची घटना रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये (Ratnagiri City Police Station) घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या चोरट्याच्या मागावर होते. नैसर्गिक विधीचं कारण सांगत चोरट्यानं पोलिसांच्या हातावर तुरी देत पोबारा केला.
रेल्वेत मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारानं हातातील बेड्यांसह पलायन केल्याची घटना रत्नागिरी शहर (Ratnagiri News) पोलीस ठाण्यात घडली आहे. मुख्य बाब म्हणजे, रेल्वेमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या या चोराच्या मागावर पोलीस मागील अनेक दिवसांपासून होते. त्याला पकडण्यात यश देखील आलं. त्यानंतर या चोरावर गुन्हा दाखल करण्यासाठी रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. गुन्हा दाखल करण्यात बराच वेळ गेल्यानं या चोरानं नैसर्गिक विधीला जातो, असं सांगितलं. त्यानंतर त्यानं थेट पोलिसांच्या हातावर तुरी देतस तिथून पलायन केलं. शनिवारी दुपारी चारनंतर ही संपूर्ण घटना घडली. पण रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमधून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे नामुश्की उडवणाऱ्या या प्रकरणात रत्नागिरी शहर पोलिसांची भूमिका ही 'हाताची घडी, तोंडावर बोट' अशीच असल्याची चर्चा सध्या शहरात सर्वत्र ऐकू येत आहे.
पळालेला चोर का होता महत्त्वाचा?
या संपूर्ण प्रकरणाची कोणतीही माहिती पोलीस प्रसारमाध्यमांना देत नाहीत. पण मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गोडसे असं या सराईत गुन्हेगाराचं नाव असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. मागील अनेक दिवसांपासून मागावर असलेल्या दत्तात्रय गोडसेचा कारनामा म्हणजे, हा 'रेल्वेमध्ये चार्जिंगला लावलेले आणि खिशातील मोबाईल चोरण्यात माहीर आहे. एकाच मार्गावरील रेल्वेची दोन किंवा चार तिकिटं काढून त्या तिकिटाच्या आरक्षणाप्रमाणे सदर डब्यामध्ये जाऊन तो मोबाईल चोरायचा. त्यानंतर चोरलेले मोबाईल मुंबईत जाऊन विकायचा आणि पैशावर मौजमजा करायचा. अखेर शनिवारी पहाटे मोबाईल चोरी करताना त्याला रेल्वे पोलिसांनी पकडलं. त्यानंतर त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पण या दरम्यानच्या काळात दोन्ही पोलिसांकडे संबंधित चोराविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. दखल घेण्याजोगी बाब म्हणजे, या चोरट्याबाबत रेल्वे पोलीस, शहर पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत अटक किंवा ताब्यात घेतल्याची नोंद नाही, असं असताना चोर पळाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Ratnagiri News : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट पुन्हा बंद करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध