एक्स्प्लोर

Ketan Agrawal and Siya Goyal: केतनला टक्कल होतं, केसांचा विग लावायचा; सिया गोयलने पोलिसांना सांगितलं लग्न न करण्याचं खरं कारण

Ketan Agrawal and Siya Goyal: केतन अग्रवाल खून प्रकरणात धक्कादायक खुलासा; 'टकलामुळे लग्न नको', मग प्रियकरासोबत रचला भयानक कट, नेमकं काय घडलं?

Ketan Agrawal and Siya Goyal:  केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासात आता धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिया गोयल (Siya Goyal) हिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते.  केतनला टक्कल होते, तो डोक्यावर केसांचा विग वापरत असल्याचे सियाला खटकत होते आणि त्यातूनच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.  तपासानुसार, सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी  (Chetan Chaudhari) यांनी केतनची हत्या करण्याचा कट रचला. केतनला (Ketan Agarwal) ट्रेकिंगची आवड असल्याची माहिती दोघांना होती. याच गोष्टीचा फायदा घेत त्याला एखाद्या किल्ल्यावर नेऊन खोल दरीत ढकलून अपघाताचा बनाव करण्याचा कट आखण्यात आला. यासाठी लोहगड किल्ल्याची (Lohagad Fort) निवड करण्यात आली. आरोपींनी तीन वेळा किल्ल्यावर जाऊन रेकी केल्याचे तपासातून समोर आले आहे. कोणत्या ठिकाणी खोल दरी आहे, कुठून ढकलल्यास अपघातासारखे भासेल, याची त्यांनी पाहणी केल्याचा पोलिसांचा दावा आहे. (Pune Crime news)
 
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी केतन आणि सिया प्रथमच लोहगड किल्ल्यावर गेले होते. तेथे एका टोकावरून केतनला ढकलण्याचा कथित प्रयत्न झाला. मात्र, खाली पडताना केतनने झाडाची फांदी पकडल्याने त्याचा जीव वाचला. त्यावेळी "साप आला होता" असे सांगून सियाने प्रसंग झाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा तपासातून समोर आला आहे. यानंतर, केतनला एकटीने दरीत ढकलणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने सियाने चेतनची मदत घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. 18  जून रोजी चेतनही लोहगड किल्ल्यावर गेला. तपासानुसार, किल्ल्यावर फिरत असताना चेतन काही अंतर राखून चालत होता. योग्य संधी साधून आणि सियाच्या इशाऱ्यानंतर चेतनने केतनला खोल दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

या घटनेनंतर सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, तपास पुढे सरकत असताना मोबाईल कॉल रेकॉर्ड, आरोपींची हालचाल, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी कट उघडकीस आणला आहे.

Siya Goyal news: सिया गोयलला तुरुंगात भेटायला कुटुंबातील कोणीचं आलं नाही
 
सिया गोयल हिला अटक झाल्यानंतर तुरुंगात तिला भेटण्यासाठी कोणीही आले नाही, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली. एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर सहसा त्याच्या कुटुंबातील सदस्या त्याला भेटायला तुरुंगात येतात. मात्र, सियाला भेटाला कोणीही आले नाही. सिया ही तिचे आई-वडील आणि भावासोबत राहत होती. तिचे वडील सध्या रुग्णालयात आहेत. आईही त्यांच्यासोबत आहे. तर दुसरीकडे चेतन चौधरी याला भेटायला त्याचे वडील तुरुंगात येऊन गेले.

आणखी वाचा

Siya Goyal Lohagad Fort: सियाच्या कृत्याच्या धक्क्याने वडील ICUमध्ये, आई म्हणाली, 'माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही लोहगडावरुन ढकलून द्या'

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget