एक्स्प्लोर

Kashimira Crime :मुलीच्या छेडछाडीनंतर डाचकुल पाडा परिसरात दोन गटांमध्ये झटापट; 25 पेक्षा जास्त रिक्षांची  तोडफोड

Kashimira Crime : डाचकुल भागात अमली पदार्थांची विक्री होते, त्यावर कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. 

ठाणे : काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा (Kashimira Dachkul Pada) येथे एका मुलीच्या छेडछाडीनंतर सोमवारी रात्री दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाल्याची घटना घडली. त्यानंतर मंगळवारी सकाळी काही जणांकडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 25 पेक्षा जास्त ऑटो रिक्षांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. 

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काही व्यक्ती हातात दांडके, लोखंडी सळ्या आणि दगड घेऊन आले होते आणि त्यांनी रिक्षांच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kashimira Crime : दोषींवर कारवाई सुरू

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन उपद्रव माजवणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी पोहोचून स्वतः नागरिकांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली व दोषींवर कारवाई करण्यासाठी सांगितले. तसेच या परिसरात अमली पदार्थ विक्री होते त्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश दिले. सध्या पोलिसांनी डाचकुल पाडा परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवला आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "डाचकुल पाडा भागात गुन्हेगारी  वाढत आहे. बाहेरून आलेले बांग्लादेशी घुसखोर, रोहिंग्या घुसखोर या ठिकाणी आलेले असण्याची शक्यता आहे. त्यावर पोलीस कारवाई करतील. या भागात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होते अशी माहिती आहे. काल काही लोकांनी इथल्या एका मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत."

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
Chandrashekhar Bawankule : सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
BMC : ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

VBA vs RSS : आरएसएसवर बंदीची मागणी, वंचित बहुजन आघाडी मोर्चावर ठाम
Voter List Fraud: 'बोगस वोटिंगचा बॉम्ब फोडणार', Aaditya Thackeray यांचा Election Commission ला थेट इशारा
Vote Scam : 'अवघ्या ८० रुपयांत मत विकले', Karnataka SIT तपासात समोर आले धक्कादायक रेट कार्ड!
Dhangekar Vs Mohol: 'खाजगी Builder ची गाडी वापरणं नैतिक आहे का?', धंगेकरांचा थेट सवाल
Andhra Bus Fire: Kurnool मध्ये खाजगी बसला भीषण आग, अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
Chandrashekhar Bawankule : सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
BMC : ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
Aishwarya Sharma And Neil Bhatts Divorce Rumours: जी भिती होती तेच झालं? ऐश्वर्यानं एकटीनं साजरी केली दिवाळी; घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा जोर
जी भिती होती तेच झालं? ऐश्वर्यानं एकटीनं साजरी केली दिवाळी; घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा जोर
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Embed widget