एक्स्प्लोर

Kalyan VIDEO : कल्याणच्या तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारलं, माजोरड्या गोकुळ झा या गुंडाला मनसैनिकांनी पकडलं, पोलिसांनी ताब्यात घेतलं

Kalyan Hospital Receptionist Case : गोकुळ झा हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर कल्याणच्या कोळसेवाडी आणि विठ्ठलवाडी पोलीस स्थानकात गुन्हे नोंद आहेत.

ठाणे : कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा आता पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. रुग्णालयातील रिसेप्शनिस्टने गोकुळ झा नावाच्या तरुणाला थांबण्यास सांगितल्याने त्याने ही मारहाण केली होती. या घटनेनंतर गोकुळ झा फरार झाला होता. आता त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी एकूण चार जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील मुख्य आरोपी गोकुळ झा सह त्याचा भाऊ रणजीत झाला अटक करून बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मारहाण करणारा रेकॉर्डवरचा हा आरोपी 22 तासांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. शेवटी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीच त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. 

Kalyan Hospital Receptionist Case : नेमकं काय घडलं? 

नांदिवली परिसरातल्या एका खाजगी रुग्णालयात एका रिसेप्शनिस्टला एका गोपाल झा नावाच्या तरुणानं बेदम मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही सारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं टिपली आहेत. संबंधित डॉक्टरांकडे काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बसले होते. त्यामुळं रिसेप्शनिस्टनं गोपाल झा नावाच्या तरुणाला थांबण्यास सांगितलं. पण तो तरुण जबरदस्तीनं डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रिसेप्शनिस्टनं अडवलं असता त्या तरुणानं तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत तरुणीचे कपडे फाटले आणि तिला जबर दुखापत झाली. या प्रकरणात पीडित तरुणीनं डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पण आरोपी गोकुळ झा फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्या भावाला, रणजीज झा याला अटक केली होती. आता झा हादेखील पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची तिच्या घरी जाऊन भेट घेतली. पीडित तरुणीच्या रुग्णालयातल्या उपचारांची सारी जबाबदारी मनसेनं घेतल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणातील आरोपी गोकुळ झा याला आम्ही धडा शिकवणार असा इशाराही त्यांनी दिला. 

झा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा

पोलीस रेकॉर्डवर झा याची गुन्हेगार म्हणून नोंद आहे. कल्याणच्या कोळसेवाडी आणि विठ्ठलवाडी पोलीस स्थानकात त्याच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान, आरोपी गोकुळ आणि त्याचा भाऊ रणजीत झा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रिसेप्शनिस्ट तरुणी ही मराठी आहे. तर झा हा गुंड परप्रांतिय आहे. त्यामुळे हा वाद आता मराठी-अमराठी या मुद्द्याकडे जात असल्याचं चित्र आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray and Mohan Bhagwat: 'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?

व्हिडीओ

Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार
ZP Election Result Celebration : झेडपी निकालानंतर उमेदवारांचं जोरदार सेलिब्रेशन Special Report
Politics On Savarkar : स्वा. सावकरांना भारतरत्न देण्याच्या चर्चेला जोर Special Report
ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report
Pashchim Maharashtra Elecction : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Mohan Bhagwat: 'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
Raj Thackeray and RSS Mohan Bhagwant: भाषेच्या आधारावर भेदभाव म्हणजे आजार म्हणणाऱ्या मोहन भागवतांना राज ठाकरेंनी सुनावलं, म्हणाले, 'मराठी आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य...'
महाराष्ट्रातील भाषिक भेदभाव म्हणजे आजार म्हणणाऱ्या मोहन भागवतांना राज ठाकरेंनी सुनावलं, म्हणाले, 'मराठी आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य...'
Kim Kardashian Net Worth: लहान बहिणीच्याच एक्स बॉयफ्रेंडला डेट करतेय 'ही' 45 वर्षांची रिअ‍ॅलिटी स्टार; 18000 कोटींच्या साम्राज्याची मालकीण, आता VIDEO होतोय व्हायरल
लहान बहिणीच्याच एक्स बॉयफ्रेंडला डेट करतेय 'ही' 45 वर्षांची रिअ‍ॅलिटी स्टार; 18000 कोटींच्या साम्राज्याची मालकीण, आता VIDEO होतोय व्हायरल
Embed widget