![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kalyan Crime: पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; वारंवार समजावूनही दोघेही ऐकत नव्हते, सिव्हिल इंजिनिअर पत्नीने उचलले टोकाचे पाऊल
पत्नीच्या 21 वर्षीय मुलीच्या तक्ररीवरून 49 वर्षीय पतीवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Kalyan Crime: पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; वारंवार समजावूनही दोघेही ऐकत नव्हते, सिव्हिल इंजिनिअर पत्नीने उचलले टोकाचे पाऊल Kalyan Crime News Husband immoral relationship with another woman civil engineer wife suicide Kalyan Crime: पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; वारंवार समजावूनही दोघेही ऐकत नव्हते, सिव्हिल इंजिनिअर पत्नीने उचलले टोकाचे पाऊल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/13/8d940a5a735237607c26a8fc49757084168395195875489_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण : एखादा कृत्याबद्दलचा संताप अनावर झाला की मग महिलाही टोकाचा निर्णय घेतात याची प्रचिती कल्याणमध्ये (Kalyan Crime) आली आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंध वैतागलेल्या महिलेने विष प्राषान करून आत्महत्या केली. महिलेचे वय 44 वर्षाची आहे. महिला सिव्हिल इंजिनिअर असून उंदीर मारण्याचे विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृत पत्नीच्या 21 वर्षीय मुलीच्या तक्ररीवरून 49 वर्षीय पतीवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पती हा मृतपत्नी आणि त्यांची 21 वर्षीय मुलीसह बदलापूर भागातील वालिवली परिसरातील एका हायप्रोफाईल सोसायटीत राहतो. काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर कल्याण पश्चिम भागातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण होऊन आरोपी पती त्या महिलेसोबत राहत होता. त्यातच 2019 साली या आरोपी पती व त्या महिलेमधील अनैतिक संबधाची माहिती सिव्हिल इंजिनिअर पत्नीला मिळाली होती. तेव्हापासून पती पत्नीमध्ये सतत यावरून वाद होऊन भांडण होत होते. मृत पत्नीने वारंवार आरोपी पतीला त्या महिलेचा नाद सोडून दे असे सांगूनही आरोपी पती ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हता.
खळबळजनक बाब म्हणजे एप्रिल 2023 मध्येही याच वादातून पती पत्नी मध्ये भांडण झाले होते. त्यावेळी आरोपी पतीने पत्नीला सांगितले की, मी त्या महिलेशी संबंध सोडणार नाही. तुला काय करायचे तू कर , असे बोलून घरातून आरोपी पती निघून गेला. त्यानंतर काही दिवसांनी त्या बाईनेही मृत पत्नीला मोबाईलवर मेसेज पाठवला की, "तुझा पती केवळ तुझ्या मुलीला भेटण्यासाठी बदलापूरला घरी येतो आणि तू त्याला जीव देईल म्हणून ब्लॅकमेल करते", असा मेसेज पाठवल्याने गेल्या एप्रिल महिन्यात पीडित पत्नीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केले. उंदीर मारण्याचे औषध घेतले. या घटनेची माहिती पीडितेच्या मुलीला मिळताच तिने तिला मुंबईला मुलुंड भागातील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार दरम्यान 15 एप्रिल 2023 रोजी पीडित पत्नीचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कल्याण पश्चिम भागातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपी पती विरोधात त्याच्याच 21 वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून 11 मे 2023 रोजी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली वाघ करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)