धक्कादायक! केळीची पानं विकताना वाद टोकाला गेला, तरुणानं कात्रीनं जखमी केलं, पतीचा मृत्यू; कल्याण APMCत थरार
Kalyan Crime: घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी चिराग सोनीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Kalyan Crime News: कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. विक्रीसाठी आलेल्या केळीच्या पानांच्या बंडलची अदलाबदल झाल्याने वाद टोकाला गेला. भर दिवसा 20 वर्षीय तरुणाने पती-पत्नीसह मुलावर कात्रीने वार केला असून यात गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू झालाय. मुलगा गंभीर जखमी असून पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे. चमनलाल कारला असे मृत व्यक्तीचे नाव असून मुलगा कार्तिक गंभीर जखमी आहे. त्याच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कल्याण APMC मार्केटमध्ये आज मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. (Crime News)
नक्की घडले काय?
चमनलाल कारला आणि चिराग सोनी हे दोघेही एपीएमसी मार्केटमध्ये केळीची पाने विक्री करतात. आज सकाळी विक्रीसाठी आणलेल्या केळीच्या पानांच्या बंडलमध्ये अदलाबदल झाली. अदलाबदली झाल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. चिरागने रागाच्या भरात कात्रीने चमनलाल, त्यांच्या पत्नीवर आणि मुलावर हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चमनलाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कार्तिक कारला गंभीर जखमी असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पत्नीला किरकोळ जखम झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी चिराग सोनीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. बाजारात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये शनिवारी भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने बाजारपेठेत गोंधळाचे वातावरण होते. एका किरकोळ वादातून 20 वर्षीय तरुणाने पती-पत्नी आणि त्यांच्या मुलावर कात्रीने हल्ला केला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे.
हेही वाचा:























