Jalna Crime Santosh Khandekar: सहा वर्षे पोलीस दलात, MPSC परीक्षा देऊन सनदी अधिकारी झाला, जालना महानगरपालिकेचे लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर कोण?
Who is Commissioner Santosh Khandekar: जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकरला 10 लाख रुपयांची लाच घेताना जालना एसीबीकडून अटक करण्यात आलय.

Jalna Crime News : जालना महानगरपालिकेचे (Jalna Mahapalika) आयुक्त संतोष खांडेकरला 10 लाख रुपयांची लाच घेताना जालना एसीबीकडून (Jalna ACB) अटक करण्यात आलय. जालना महानगरपालिके अंतर्गत केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडून ही लाच (Jalna Crime News) स्वीकारताना एसीबीच्या पथकाने या आयुक्ताला रंगेहाथ पकडलंय. जालना शहरातील डीपी रोड, सीमेंट काँक्रिटकरण आणि मनपाच्या तिसऱ्या मजल्याच्या कामाची वर्क ऑर्डर तसेच बिलांच्या मंजुरीसाठी आयुक्त संतोष खांडेकरने (Santosh Khandekar) तक्रारदाकडे 20 लाखांच्या लाचेची मागणी केली होती, ही लाच देण्याची इच्छा नसल्याने एसीबीकडे केलेल्या तक्रारीवरून आयुक्त खांडेकर याच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचला असता ही 10 लाखांची रोकड स्विकारताना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले.
दरम्यान या कारवाईनंतर पहाटेपर्यंत जालना आणि संभाजीनगर एसीबी पथकाकडून खांडेकर यांच्या घराची झडती सुरू आहे. दरम्यान काल रात्री साडेसात वाजता ही कारवाई केल्यानंतर काही कंत्राटदारांनी जालना एसीबी कार्यालयाबाहेर दिवाळीपूर्वीच फटाके फोडून एसीबीच्या कारवाईचे स्वागत केल्याचं पहायला मिळाले.
लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर कोण? (Who is Commissioner Santosh Khandekar?)
संतोष खांडेकर हे मूळचे सांगोला, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी.
सुमारे सहा वर्षे पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून यवतमाळ, अमरावती येथे पोलिस खात्यात सेवा केली.
एमपीएससी मार्फत वर्ग दोन अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू.
सन 2022 मध्ये जालना नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती.
9 मे 2023 रोजी जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्यात आले, यावेळी मनपाचे पहिले आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
त्यानंतर महानगरपालिकेचे प्रशासकीय पदी नियुक्ती करण्यात आली.
Gondia News : ट्रेनच्या धडकेत 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
रेल्वे ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला पतंग आणायला गेलेल्या एका 7 वर्षात चिमुकलीचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गोंदियाच्या आमगाव येथील कुंभारटोली परिसरात घडली. काल सायंकाळी शाळेला सुट्टी झाल्यानंतर कनिष्का मेश्राम ही 7 वर्षीय चिमुकली आपल्या घराजवळ पतंग खेळत होती. दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला पतंग पडली असता ती आणायला ती जात असताना रेल्वे एक्सप्रेसने तिला धडक दिली यातच तिचा मृत्यू झाला. कनिष्काच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून घटनेची नोंद आमगाव पोलिसांनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या:
























