एक्स्प्लोर

अजब चोराची गजब कहाणी! डोक्यावर टक्कल; पण ओळख लपवण्यासाठी केसांचा विग लावायचा

Jalna Crime News : या अजब चोराची गजब कहाणी ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे.

Jalna Crime News : चोरी करताना आपली ओळख पटू नये म्हणून अनेकदा चोरटे तोंडाला रुमाल बांधतात किंवा अनेक प्रयोग करून स्वतःची ओळख लपवत असतात. पण जालना (Jalna) शहरात एका चोराने त्यापुढे जात भन्नाट जुगाड लावत आपली ओळख पोलिसांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेकदा सीसीटीव्हीत कैद होऊन देखील तो पोलिसांना सापडत नव्हता. मात्र, पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठोकल्या असून, त्याच्या अजब चोराची गजब कहाणी ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. 

टक्कल असताना रात्री चोरी करायची, मात्र ओळख पटू नये म्हणून दिवसा डोक्यावर बनावट केसांचे विग लावून हा चोर फिरायचा. त्यामुळे अनेकदा सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतरही या चोराची खरी ओळख पटत नव्हती. अंबड शहरासह पैठण, पाचोड येथे विविध ठिकाणी चोरी करणाऱ्या या चोराने पोलिसांसमोर एकप्रकारे आव्हान उभे केले होते. शेवटी या चोराला अंबड पोलिसांनी रविवारी (30 जुलै)  रोजी बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर त्याचा भंडाफोड झाला आहे. मुस्तफा अब्दुल सय्यद (वय 25 , रा. चंदनझिरा, जालना) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या मुद्देमालासह चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.

अंबड शहरात दोन महिन्यांपूर्वी चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने खळबळ उडाली होती. अंबड शहराच्या मध्यवस्ती भागात असलेले बागडे ज्वेलर्स या सराफा दुकानाची मागील भिंत फोडून चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला होता. सोबतच याच भागातील आशीर्वाद मेडीकल, साई मेन्स वेअर येथेही चोरी झाली होती. पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपीचा शोध घेतला जात होता. विशेष म्हणजे हा आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला होता. मात्र, यात टक्कल असलेला संशयित आरोपी दिसत असल्याने पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. 

असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात...

या चोऱ्यांचा तपास करत असताना पाचोड रोडवरील एका पेट्रोलपंपाजवळ एक संशयित चोरीची दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा लावला. संशयित एका विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आल्यानंतर पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला. मात्र, तो पाचोडच्या दिशेने पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्यास पाठलाग करून पकडले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र, त्यास अंबड ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता, त्याने अंबड शहरात ठिकठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच पाचोड व पैठण येथे आटोपार्टच्या दुकानात चोरी करून एक दुचाकी व स्कुटी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा लॅपटॉप, रेडीमेड कपडे, दोन दुचाकी, गॅस टॉकी, कटर आदी साहित्य जप्त केले आहे. तर टक्कल असलेला मुस्तफा दिवसा डोक्यावर बनावट केसांचे विग लावून फिरायचा. त्यामुळे पोलिसांना त्याची ओळख पटविणे शक्य होत नव्हते.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Eye Conjunctivitis : परभणीसह जालना जिल्ह्यात डोळ्याची साथ; संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 PM 07 October 2024Zero Hour : 40 हजार कोटींची बिलं थकली, कंत्राटदारांवर आंदोलनाची वेळZero Hour Nagpur : बौद्ध लेणींच्या बचावासाठी एकवटले संभाजीनगरकरABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 9 PM 07 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Vastu Tips : रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget