एक्स्प्लोर

Eye Conjunctivitis : परभणीसह जालना जिल्ह्यात डोळ्याची साथ; संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन

Eye Conjunctivitis : डोळ्यातून पाणी येणे, घाण येणे, डोळे लाल होणे या आजाराची प्राथमिक लक्षणं दिसून येतायत.

Eye Conjunctivitis : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल (Climate Change) होत असल्याने, राज्यातील अनेक भागात डोळ्याची साथ पाहायला मिळत आहे. दरम्यान मराठवाड्यातील जालना आणि परभणी (Eye Conjunctivitis in Jalna-Parbhani) या दोन जिल्ह्यात देखील आता डोळ्याची साथ पाहायला मिळतेय. ज्यात माणसांच्या डोळ्यातून पाणी येणे, घाण येणे, डोळे लाल होणे या आजाराची प्राथमिक लक्षणं दिसून येतात. त्यामुळे जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या नेत्रविभागात रुग्णांची वाढ होतांना दिसत आहे. तर डोळ्याच्या खाजगी रुग्णालयात देखील रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. 

जालना जिल्ह्यात डोळ्याची साथ...

मागील काही दिवसांपासून जालना शहरात डोळे येण्याची साथ पाहायला मिळत आहे. दरम्यान यात आणखीच वाढ होतांना दिसत आहे. ज्यामुळे डोळ्यांचे रुग्ण झपाटयाने वाढू लागले आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या नेत्रविभागात दररोज 25 ते 30 रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तर हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

मागील काही दिवसांत वातावरणात सतत बदल होत असल्याने याचे परिणाम माणसांच्या आरोग्यावर देखील जाणवत आहे. ज्यात काही दिवसापासून अनेक ठिकाणी डोळे आलेले रूग्ण आढळून येत असल्याने नागरीकांची चिंता वाढली आहे. जालना शहरात देखील अनेकांना असाच काही त्रास जाणवत आहे. ज्यामुळ डोळ्यांना जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे असे लक्षणे दिसत आहे. तर डोळे येण्याची लक्षणे म्हणजे डोळ्यात लालसरपण येणे, सूज येणे, खाज सुटणे असे लक्षणे दिसत आहे. 

परभणीत देखील रुग्णांची वाढ...

जालनाप्रमाणेच परभणी (Parbahni) जिल्ह्यात देखील डोळे येण्याचा संसर्गजन्य आजार वाढलेले असून याचे रूग्ण जिल्हा रूग्णालयात दररोज शंभराहून अधिक उपचारासाठी येत आहेत. डोळे येणे हा एकप्रकारचा संसर्गजन्य रोग आहे. विशेषत पावसाळयात हा आजार होण्याचे प्रमाण जास्त असते. या आजारालाच पिंक आय असेही म्हटले जाते. कधीकाळी दोन्ही डोळयांवर संसर्ग होवू शकतो. या आलेल्या आजारात डोळयांना खाज, चिकटपणा, सुज येणे, डोळे लालसर पडणे, डोळयातून पिवळा द्रव बाहेर येणे आदी लक्षणे आढळतात. डोळयांचा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी यात नागरिकांनी वैद्यकीय तात्काळ सल्ला घेणे आवश्यक आहे. तर परभणी जिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात डोळ्याचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nagpur News : नागपुरात डोळ्यांची साथ, 25 टक्के लहान मुलांमध्ये लक्षणं; विशेष लक्ष देण्याच्या शाळांना सूचना

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 16 March 2025Special Report | Beed Crime | बीडमध्ये चालकाला डांबून ठेवत जबर मारहाण, हत्येनंतरची ऑडिओ क्लिप व्हायरलSpecial Report | Beed Teacher Story | परिस्थिने हताश केलं, शिक्षकांने मृत्यूला कवटाळलं; धनंजय नागरगोजेंची मन हेलावून टाकणार पोस्टBhaskar Khatgaonkar : काँग्रेसचे भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिंदेंकडून पण होती ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Embed widget