Atal Setu : अटल सेतूवर गाडी थांबवली अन् जे.जे.रुग्णालयातील डॉक्टरने स्वत:ला झोकून दिलं; लवकरच जेवणासाठी घरी येतो..., आईचा 'तो' कॉल ठरला शेवटचा
Mumbai Crime News : अटल सेतू या मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या महत्वपूर्ण महामार्गाच्या पुलावरून जे.जे. रुग्णालयातील एका डॉक्टरने उडी मारलीय.

J.J. Hospital Doctor Attempts Suicide from Atal Setu : मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी बांधण्यात आलेल्या अटल सेतू पुन्हा एकदा आत्महत्येच्या घटनेने चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या अटल सेतुवरून मोठ्या प्रमाणात आत्महत्या करण्याचं प्रमाणा वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. परिणामी, अटल सेतू हा जणू आता सुसाईड पॉईंट झाला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अटल सेतूवर वारंवार होणाऱ्या आत्महत्येच्या घटना घडताना दिसत आहेत. अशातच यात आणखी एक आत्महत्या (Mumbai Crime News) घडल्याची घटना समोर आली आहे.
अटल सेतूवर कार थांबली, डॉक्टरने स्वत:ला झोकून दिलं
अटल सेतू या मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या महत्वपूर्ण महामार्गाच्या पुलावरून जे.जे. रुग्णालयातील एका डॉक्टरने उडी मारलीय. सोमवारी रात्री ही घटना घडली असून अद्याप या डॉक्टरचा शोध लागलेला नसल्याची माहिती आहे. दरम्यान ही घटना एका व्यक्तीने बघितली असून यात त्या व्यक्तीला डॉक्टर पुलावरून खाडीत उडी मारताना दिसलेत. त्यानंतर त्या व्यक्तीने लगेच पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे हा प्रकार उजेडात आला आहे.
पुलावर होंडा अमेझ कार आणि आयफोन मिळाला
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत तपास केला असता पुलावर चारचाकी आणि मोबाईल मिळाला. यात डॉ.ओंकार भागवत कवितके (वय 32) असे अटल सेतूवरून खाडीमध्ये उडी मारणाऱ्या व्यक्तीचे नाव कळू शकले आहे. ओंकार कवितके हे जे.जे. रुग्णालयात डॉक्टर पदावर कार्यरत आहेत. ते कळंबोली येथील रहिवाशी असून सोमवारी रात्री ते अटल सेतूवर आले आणि त्यांनी गाडी थांबवत क्षणात खाडीत उडी मारली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना केलेल्या तपासत पुलावर होंडा अमेझ आणि एक आयफोन मिळाला. ओंकार कवितके यांनी उडी मारली असल्याचे समजल्यानंतर ध्रुवतारा बोट शोधप्रक्रियेसाठी रावण झाली. खाडीमध्ये ओंकार कवितके यांचा शोध घेतला जात आहे. त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला, याबद्दलही आता पोलीस तपास करत आहेत.
लवकरच जेवणासाठी घरी येतो.., आईला शेवटचा कॉल
पोलिसांनी सांगितले की, “आम्ही फोन कॉल डिटेल्स तपासले तेव्हा आम्हाला आढळले की डॉक्टरांनी सोमवारी रात्री 9.11 वाजता त्याच्या आईला शेवटचा फोन केला होता आणि तिला सांगितले होते की तो लवकरच जेवणासाठी घरी येत आहे...” असे उलवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन राजणे म्हणाले.
हे ही वाचा
























