Jalna Crime : इन्स्टाग्रामवर मैत्री करुन ब्लॅकमेल केलं, तरुणाच्या जाचामुळे नैराश्यात गेलेल्या 17 वर्षीय मुलीने गळ्याला दोर लावला
Jalna Crime :
Jalna Crime : जालना जिल्ह्यातील अंबड येथे छेडछाड करून ब्लॅकमेल करणाऱ्या एका तरुणाच्या जाचाला 11 वीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तरुणाच्या सततच्या येणाऱ्या धमक्यांमुळे 17 वर्षीय मुलीने गळफास लावून जीवनयात्रा संपवली (Jalna Crime) आहे. अंबड शहरातील शारदानगर भागात राहणाऱ्या या तरुणीला आरोपींने instagram वरती ओळख करून मैत्रीच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करून धमकावल्याने आज (दि.10) सकाळी या तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
यापूर्वी आरोपी तरुणाविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार
अधिकची माहिती अशी की, अकारावीमध्ये शिकत असलेल्या मुलीची सातत्याने एका तरुणाकडून छेड काढण्यात येत होती. इन्स्टाग्रामवर मैत्री करुन त्यानंतर तरुणाने मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. इतकचं नव्हे तर तरुणाकडून मुलीला धमक्याही देण्यात येत होत्या. जीवन संपलेल्या मुलीने यापूर्वी आरोपी तरुणाविरोधात पोलीस (Police) ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका सोहम मिंधर नावाच्या आरोपी तरुणास अटक देखील केलं आहे. या प्रकरणी इतर आरोपी असल्याचा संशय असून पोलीस (Jalna Crime) याचा तपास करत आहेत.
पाच वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले, पण प्रियकराने प्रेयसीला संपवलं
काही दिवसांपूर्वी पुण्यातही प्रेम प्रकरणातून मोठी घटना समोर आली होती. पाच वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या प्रियकराने प्रेयसीला संपल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे पाच वर्षे रिलेशनमध्ये राहिल्यानंतर प्रेयसीने एका मुलाला जन्म दिला होता. मात्र, शेवटच्या काही महिन्यांमध्ये प्रियकर आणि प्रेयसीमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली होती. हा वाद टोकाला गेला आणि प्रियकराने प्रेयसीला संपवले. त्यानंतर प्रियकराने आपल्या मुलाला आळंदीत सोडलं होतं. मात्र, अखेरीस हा पोलीस तपासात संपूर्ण प्रकरणाचं बिंग फुटलं होतं. या प्रकरणी दिनेश ठोंबरे याला अटक करण्यात आली होती, तर जयश्री मोरे अस हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव होते.
Kurla Best Bus Accident: आम्हाला सरकारचे 5 लाख नको, अपघातात आई गेली; मुलगा म्हणाला, मृतदेह नेण्यासाठीही पैसे मागताय!https://t.co/bSTcy8szjU#RoadAccident #KurlaBusAccident #kurlaaccident #BEST
— ABP माझा (@abpmajhatv) December 10, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या