एक्स्प्लोर

चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं परभणी हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

परभणीच्या जिंतूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

Parbhani Crime News : परभणीच्या जिंतूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीनं स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन कबुली दिली आहे. 

आरोपी पतीने पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली

चारित्र्यावर संशय घेत पतीने थेट पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा घडली आहे. घटना घडल्यानंतर आरोपी पतीने पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. सुमित्रा श्रीधर गायकवाड असे 38 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती श्रीधर गायकवाड याने तिला घरातून दुचाकीवर बसवून जिंतूर-जालना महामार्गालगत असलेल्या गट क्रमांक 8 मधील शेतातील आखाड्यावर नेले. तिथे गेल्यानंतर त्याने प्रथम काठीने मारहाण केली. त्यानंतर संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची जागीच हत्या केली. 

 चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दरमयान, घटना घडल्यानंतर पती श्रीधर याने स्वतः चारठाणा पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकाराची माहिती देत गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे,बीट जमादार उद्धव माने, उद्धव सातपुते तसेच गुप्तचर विभागाचे उमेश बारहाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून पुढील चौकशीनंतर खुनामागील नेमके कारण स्पष्ट होईल,अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान,या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

धाराशिवच्या तुळजापुरामध्ये गेल्या काही दिवसात हत्येच्या घटनांनी खळबळ

धाराशिवच्या तुळजापुरामध्ये गेल्या काही दिवसात हत्येच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. सहा महिन्यात तीन हत्येच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक वेळा गोळीबार झाला आहे. त्यामुळं तुळजापूर शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. कृष्णा रसाळ या 19 वर्षीय  तरुणाची किरकोळ वादातून हत्या घडली आहे या प्रकरणात आरोपीला अटकही करण्यात आली आहे. मात्र या घटनेने तुळजापूर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेली सहा महिन्यातल्या प्रत्येक घटनेतील आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रत्येक घटनेवर कारवाई केली असून पोलीस सक्षम असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र तुळजापुरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे. सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget