एक्स्प्लोर

Kalyan Durgadi Fort : बापरे! बनावट कागदपत्रांच्या आधारे ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच नावावर केला, गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू

Kalyan Durgadi Fort News : आरोपीने दुर्गाडी किल्ल्याच्या जागेचे वंशज असल्याचा दावा करून आख्खा किल्लाच नावावर करून घेतला आहे. जमा करण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याचं समोर येताच गुन्हा दाखल करण्यात आला. 

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन अशा  कल्याण पश्चिम भागातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला (Kalyan Durgadi Fort) बनावट कागदपत्रे (Fake Documents) तयार करून नावावर केल्याची घटना घडलीय. किल्ल्याची जागा नावावर करणाऱ्या बंटी विरोधात विविध कलमानुसार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सुयश शिर्के (सातवाहन) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून तो माळशेज  नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटक स्थळ विकास समितीचा अध्यक्ष असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. 

बंटी-बबली या हिंदी चित्रपटात ताजमहल आपल्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून  विक्री करण्याचा प्रसंग दाखविण्यात आला. अशाच प्रकारे  कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच्या जागेचे वंशज असल्याचं दाखूवन बनावट कागदपत्रांच्या आधारे तो स्वतःच्या नावाने केला. मात्र जागा विक्री होण्यापूर्वीच हा प्रकार कल्याण मंडळ अधिकारी असलेल्या महिला अधिकारी प्रीती घुडे यांच्यामुळे  उघडकीस आला. घुडे यांनी 2 नोव्हेंबर रोजी सुयश शिर्के (सातवाहन ) यांच्यावर भादंवि कलम 420, 465,466, 468, 471, 773 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 

अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल झालेला सुयश शिर्के  याने 12 सप्टेंबर 2022 रोजी किल्ल्याची जागा आपल्या नावाने करण्यासाठी नाहरकत दाखल्यासाठी अर्ज दिला होता. या अर्जात त्याने  शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार असल्याचा उल्लेख करून कल्याण तहसील कार्यालयातील 5 ते 7 कागदपत्रांवर शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असलेले कागदपत्रं अर्जसोबत जोडले होते. सदरच्या जागेचे  प्रकरण ऐतिहासिक किल्ल्याविषयी असल्याने मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यलयात पाठविण्यात आले होते. 

दरम्यानच्या काळात किल्ल्याची पडझड झाल्याने दुरुस्ती करावी म्हणून स्थानिक बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठाणे  जिल्हा अधिकारी कार्यलयाशी पत्र व्यवहार करून किल्ल्या संदर्भात लेखी माहिती मागवली असता, सदरची जागा  शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार यांची असल्याने त्यांच्याकडून दुरुस्तीची परवानगी द्यावी असा उल्लेख करत पोलिसांना कळविण्यात आले. 

तहसीलदारांच्या नावाचे बनावट लेटर सापडले 

दुसरीकडे कल्याण मंडळ अधिकारी कार्यलयात या किल्ल्याच्या जागे संदर्भात 24 फेब्रुवारी 2023 रोजी दस्तऐवज तपासणी दरम्यान कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या नावाने बनावट लेटरसह अधिकाऱ्यांच्या  स्वाक्षरी केलेल्या दस्तऐवज आढळून आल्याने हा खळबळजनक प्रकार  उघडकीस आला. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी कल्याण तहसीलदार कार्यालयातील  मंडळ अधिकारी प्रीती घोडे यांच्या तक्रारीनंतर कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात सुयश शिर्के नामक व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या संर्दभात साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्याशी संपर्क साधला असता, दुर्गाडी किल्ल्याची जागा आपल्या वंशजाची आहे असे भासवून खोटी कागदपत्र तयार केल्याने सुयश शिर्के याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच  शिर्के हा माळशेज  नाणेघाट व इतर वनक्षेत्र आणि पर्यटकस्थळ विकास समितीचे अध्यक्ष असल्याची माहितीही त्यांनी दिली असून पोलीस  आरोपीचा  शोध घेत असल्याचे सांगितले.

ही बातमी वाचा:

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?
नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, ठाकरे गटाचा आक्षेप, नेमकं कारण काय?
Rohit Sharma : रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टी 20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
Chiplun Crocodile : नागरिकांची पाचावर धारण, चिपळूणमध्ये शिव नदीतून मगर रस्त्यावर अन् थाटात वावर, पाहा व्हिडीओ
रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मानवी वस्तीत मगरीची एंट्री, मुख्य रस्त्यावर थाटात वावर, नागरिकांमध्ये घबराट
Maharashtra Accident: यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10:00AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLonavala Bhushi Dam : डोळ्यादेखत कुटुंब वाहून गेलं, तिघांचे मृतदेह सापडले, दोघे अजूनही बेपत्ताTOP News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 सेकेंदात बातमी : 1 July 2024 : ABP MajhaMaharshtra Crime Special Report : 48 तासात गोळीबाराच्या तीन घटना, महाराष्ट्रात चाललंय तरी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?
नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, ठाकरे गटाचा आक्षेप, नेमकं कारण काय?
Rohit Sharma : रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टी 20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
Chiplun Crocodile : नागरिकांची पाचावर धारण, चिपळूणमध्ये शिव नदीतून मगर रस्त्यावर अन् थाटात वावर, पाहा व्हिडीओ
रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मानवी वस्तीत मगरीची एंट्री, मुख्य रस्त्यावर थाटात वावर, नागरिकांमध्ये घबराट
Maharashtra Accident: यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
Singer Monali Thakur :   भर कॉन्सर्टमध्ये नको ते घडले, आक्षेपार्ह वर्तवणुकीने गायिका मोनाली ठाकूर संतापली...
भर कॉन्सर्टमध्ये नको ते घडले, आक्षेपार्ह वर्तवणुकीने गायिका मोनाली ठाकूर संतापली...
Jaykumar Gore : कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवत कोट्यवधी रुपये लाटले, आमदार जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप, अडचणीत वाढ?
कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवत कोट्यवधी रुपये लाटले, आमदार जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप, अडचणीत वाढ?
Kalki 2898 AD Worldwide Box Office Collection :  जगभरात कल्कीचा डंका, वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस; चार दिवसात किती कमावले?
जगभरात कल्कीचा डंका, वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस; चार दिवसात किती कमावले?
MLC Election 2024: विधानपरिषद निवडणुकीसाठी अजितदादा गटाचे उमेदवार ठरले? शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकरांना संधी मिळण्याची दाट शक्यता
विधानपरिषदेसाठी अजितदादा गटाचे उमेदवार ठरले? शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकरांना संधी मिळण्याची दाट शक्यता
Embed widget