एक्स्प्लोर

खिडकीतून लपून मुलींना आंघोळ करताना बघायचा; घराबाहेर कॅमेरा लावला अन् तावडीत सापडला, भाईंदरमधील घटना

Crime News: आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Crime News भाईंदर: भाईंदरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकजण खिडकीतून लपून लहान मुलींना आंघोळ करताना बघत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड झालं. 

भाईंदर पश्चिम परिसरात एक जण लहान मुलींना आंघोळ करताना खिडकीतून लपून बघायचा. त्यानंतर मुलीने तिच्या आईला सांगितले. यानंतर आईने त्याला पकडण्यासाठी घरा बाहेर कॅमेरा लावला. त्यात तो पहाटे 4 वाजता दोन दिवस खिडकीतून पाहाताना दिसला. 

आरोपीला मनसे स्टाईलने दिला चोप-

सदर संपूर्ण प्रकरण संबंधित मुलीच्या आईने मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. यानंतर मुलीच्या आईने मनसे कार्यालयात अभिनंदन चव्हाण यांना तक्रार केली असता मिरा भाईंदर मनसे महिला सेना  याठिकाणी मंगळवारी संध्याकाळी 8 वाजता दाखल होताच त्याला मनसे स्टाईलने चोप देण्यात आला व त्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्या आरोपीला अटक करून आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस) चे कलम 77खाली गुन्हा दाखल केला आहे.

शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

देशभरात उद्या नवरात्री उत्सावाची तयारी सुरू असून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे दिसून येते. बदलापूमधील शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातील विविध जिल्ह्यात महिला व अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे, महिला अत्याचाराच्या घटनांवरुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाकडून याबाबत कडक पाऊले उचलण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, दररोज नव्या ठिकाणावर अशा घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता, चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कोरपना येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात आरोपी अमोल लोडे याला अकोल्यातुन अटक करण्यात आली आहे. आरोपी अमोल लोडे युवक काँग्रेसचा (Congress) कोरपना शहर अध्यक्ष आहे. कॉन्व्हेंट शाळेत शिक्षक असलेल्या लोडे याने 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, या घटनेचे राजकीय पडसादही उमटताना दिसून येत आहेत. उन्हाळ्यात ज्युनिअर IAS class घेण्याचे बहाण्याने आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला शाळेत बोलावून अत्याचार केला. सोबतच तुझ्या आई-वडिलांना जीवानिशी मारून टाकेन धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली होती. मात्र, पीडित मुलीने मैत्रिणीकडे या घृणीत प्रकरणाची वाच्यता केल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी, पोलिसांनी pocso कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

संबंधित बातमी:

खिडकीतून लपून मुलींना आंघाळ करताना बघायचा; घराबाहेर कॅमेरा लावला अन् तावडीत सापडला, भाईंदरमधील घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Embed widget