Gujrat Drugs Seized : उडता गुजरात! तीन हजार किलोंचं ड्रग्स जप्त, 4 जणांना अटक
Gujrat Crime News : पोरबंदर किनारपट्टीवर कोट्यवधींचं ड्रग्स जप्त करत मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Gujrat Drugs Seized : गुजरातच्या किनारपट्टीवर (Gujrat Coast) 3 हजार किलोंचं ड्रग्स जप्त (Drugs) करण्यात आले असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. पोरबंदर किनारपट्टीवर (Porbandar) कोट्यवधींचं ड्रग्स (Drugs Seized) जप्त करत मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुजरात एटीएस, नौदल आणि एनसीबीने ही संयुक्त कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरून बोटीतून अंमली पदार्थ गुजरातमध्ये आणले जायचे अशी माहितीही समोर आली आहे.
पोरबंदर किनारपट्टीवर कोट्यवधींचे ड्रग्स जप्त
गुजरातच्या किनारपट्टीवर पुन्हा एकदा ड्रग्ज पकडण्यात आले आहे. पोरबंदर किनारपट्टीवर अंमली पदार्थविरोधी मोठी कारवाई करण्यात प्रशासनाला यश आलं आहे. नौदल आणि तटरक्षक दलाने संयुक्त ऑपरेशन राबवत कोट्यवधींचे ड्रग्स जप्त केले आहेत. पोरबंदर समुद्रातून अंमली पदार्थांसह आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तीन हजार किलोंच्या ड्रग्ससह 4 जणांना अटक
तीन हजार किलो ड्रग्जसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, भारतीय नौदल आणि गुजरात एटीएसने मिळून ही मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून 2000 ते 2500 कोटी रुपयांची औषधे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात चरस आणि इतर मादक पदार्थही जप्त करण्यात आले आहे.