दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सात जणांची टोळी गजाआड, डोंबिवली रामनगर पोलिसांची कारवाई
Crime News: दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सात जणांच्या टोळीला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या सात जणांचा टोळीत तीन रिक्षा चालकासह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
Crime News: दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सात जणांच्या टोळीला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या सात जणांचा टोळीत तीन रिक्षा चालकासह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सागर उर्फ मुन्ना शर्मा, जेम्स सुसे, सत्यकुमार कनोजिया, सचिन ऊर्फपिल्लु राजभर, सोनू कनोजिया असं या अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. यामधील मुन्ना व सत्यकुमार हे रिक्षाचालक असून दोघे मुख्य सूत्रधार होते. हे दोघे दिवसभर रिक्षा चालविण्याच्या नावाखाली रेकी करत प्लॅनिंग करत असत. रात्रीच्या सुमारास आपल्या साथीदारांच्या मदतीने निर्जन स्थळी पादचाऱ्याला गाठत लुटत असतात. या टोळी विरोधात डोंबिवली, रामनगर, टिळक नगर, मानपाडा, हीललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली परिसरात चोरी च्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष पथके तयार करत या चोरट्यांचा शोध सुरू केला. काही चोरटे चोरी करण्याच्या तयारीत म्हसोबा चौक येथे येणार असल्याची माहिती डोंबिवली रामनगर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, बळवंत भराडे, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, सुनील भणगे यांच्या पथकाने म्हसोबा चौक येथे सापळा रचला. या दरम्यान सात जण या ठिकाणी संशयस्पद रित्या फिरताना या पथकाला आढळून आले. पोलिसांनी तात्काळ या सात ही जणांना ताब्यात घेत त्यांची झडती घेत चौकशी केली असता पोलिसांना या सातही जणांवर संशय बळवला. त्यांच्याजवळ धारदार कोयता, चाकू, कटावणी, स्क्रू डायव्हर अशा घातक शस्त्रांसह मिरचीची पूड आणि एक नायलॉन दोरी आढळून आली.
पोलिसांनी या सातही जणांना अटक करत त्यांची चौकशी सुरू केली. या सात जणांमधील तिघेजण रिक्षा चालक आणि दोन अल्पवयीन आरोपी आहेत या टोळीचा म्होरक्या मुन्ना आणि सत्या हे दोघे रिक्षाचालक असून हे दोघे दिवसभर रेकी करायचे. कुठे लुबाडायचे याचं नियोजन दिवसभर करत रात्रीच्या सुमारास आपल्या साथीदारांचा निर्जन स्थळी पादचाऱ्यांना गाठून चाकूचा धाक दाखवत त्यांना लुबाडत असत. त्यांच्याकडून रामनगर, टिळकनगर, मानपाडा, हिललाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिक्षा, दुचाकी, मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात तपास पथकाला यश आले. 2018 पासून ही टोळी चोऱ्या करत आहे. हे सात ही जण म्हसोबा चौक परिसरात राहणारे असून ते मुळचे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणाचे रहिवासी आहेत. तपासा दरम्यान अटक आरोपींकडून एक रिक्षा, दोन बाईक, दोन महागडे मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली.