एक्स्प्लोर

पुणे-सोलापूर महामार्गावर फायरिंग करत 3.60 कोटी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सहा जणांना अटक

पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तब्बल तीन तर इंदापूर पोलिसांची तीन अशी सहा पथके तैनात केली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तब्बल तीन तर इंदापूर पोलिसांची तीन अशी सहा पथके तैनात केली होती.

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune Solapur Highway) इंदापूर तालुक्यातील  वरकुटे बुद्रुक जवळ शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार करून 3 कोटी 60 लाख रुपये लुटून धूम ठोकणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) ला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. आंगडीया कंपनीच्या वाहनातून ही लूट करण्यात आली होती. गोळीबार करत रक्कम लुटल्याप्रारकरणी इंदापूर पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

 या घटनेचा छडा लावण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तब्बल तीन तर इंदापूर पोलिसांची तीन अशी सहा पथके तैनात केली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तब्बल तीन तर इंदापूर पोलिसांची तीन अशी सहा पथके तैनात केली होती.. आरोपींकडून पोलीसांनी 1 कोटी 43 लाख 20 हजार  रूपये जप्त केले आहेत.  

पोलीसांच्या पथकाने सागर शिवाजी होनमाने रा. कुर्डूवाडी ता. माढा जि.सोलापूर याने इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सागर शिवाजी होनमाने, बाळू उर्फ ज्योतीराम चंद्रकांत कदम (वय 32 वर्षे, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि रजत अबू मुलाणी (वय 24 वर्षे, रा. न्हावी, ता. इंदापूर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारासह गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलीसांनी तपासात सागर होनमाने याकडून 72 लाख रुपये, रजत अबू मुलाणी याचेकडुन 71 लाख 20 हजार रूपये असे एकूण 1 कोटी 43 लाख 20 हजार  रूपये जप्त केले आहेत. त्यादरम्यान अटक प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रत्येकी एक असे दोन पथक तात्काळ राजस्थान येथे रवाना करण्यात आले होते. त्या पथकाने गुन्ह्यातील सहभाग असणारे आरोपी  गौतम अजित भोसले (वय 33 वर्षे, रा.वेने, ता. माढा, जि. सोलापूर), किरण सुभाष घाडगे (वय 26 वर्षे, रा. लोणीदेवकर, ता. इंदापूर, जि. पुणे),  भूषण लक्ष्मीकांत तोंडे (वय 25 वर्षे, रा. लोणी देवकर, ता. इंदापूर, जि.पुणे) यांना राजस्थान उदयपूर येथील प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक पोलीसांच्या मदतीने राजस्थान येथून ताब्यात घेतलेले आहे.

26 ऑगस्टला मध्यरात्री 3 कोटी 60 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यापैकी फक्त 1 कोटी 43 लाख 20 हजार रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. बाकी रक्कम वसूल करण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असले तरी  आणखी कुणाची नावे समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. इतकी आंगडीया कंपनीची रक्कम ही स्कॉर्पिओ गाडीतून नेणार आहेत याची माहिती आरोपींना कशी मिळाली? कॅश वाहून नेणाऱ्या कंपनीतील कुणी फुटीर आहे का? अशा अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget