मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
Camel Smuggling : आयशरमधून 16 उंटाची निर्दयपणे वाहतूक केली जात होती. पोलिसांनी कारवाई करत 16 उंटांची सुटका केली.
हिंगोली : उंटाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांना कारवाई करण्यात यश मिळालं आहे. आयशर चालकासह वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आयशरमधून 16 उंटाची निर्दयपणे वाहतूक केली जात होती. पोलिसांनी कारवाई करत 16 उंटांची सुटका केली आणि आरोपींनी ताब्यात घेतलं. तस्करीसाठी निर्दयीपणे उंटांची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
16 उंटाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
आखाडा बाळापूर पोलिसांच्या वतीनं रात्रगस्तीचं काम सुरू असताना हिंगोली नांदेड रोडवर एका आयशर मधून 16 उंटाची वाहतूक केली जात असल्याचा समोर आले हे उंट कत्तलीसाठी घेऊन जात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी 21 लाख रुपयाचा मुद्देमालासह वाहन चालकासह उंट आणि आयशर ताब्यात घेतला आहे याप्रकरणी आकडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन जणांवर गुन्हा दाखल
हिंगोली-नांदेड रोडवर जरोडा शिवारातील टोल नाक्यावर एका आयशरमधून उंटाची वाहतूक केली जात होती, पोलिसांच्या तपासणी दरम्यान हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मध्य प्रदेश येथील आरोपीसह एकूण तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.