एक्स्प्लोर

मोठी बातमी : लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्याचं आत्मसमर्पण, गडचिरोली नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश

Gadchiroli Naxal Surrender : एका जहाल माओवाद्याने गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे. या माओवाद्यावर शासनाने 6 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली : प्रशासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 662 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे.  सहा लाख रुपये बक्षीस असलेला जहाल माओवादी गणेश गट्टा पुनेम वय 35 वर्ष याने आज  आत्मसमर्पण केलं आहे. गणेश गट्टा पुनेम, हा मूळचा छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील बेच्चापाल, भैरमगड येथील रहिवासी आहे. माओवादी गणेशने सीआरपीएफचे पोलीस उप-महानिरीक्षक जगदीश मीणा यांच्या समोर आत्मसमर्पण केले, त्यानंतर त्यांनी त्याचे हस्तांतरण गडचिरोली पोलीस दलाकडे केलं आहे. 

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती

नाव - गणेश गट्टा पुनेम

दलममधील कार्यकाळ

  • 2017 मध्ये सप्लाय टिम (भैरमगड एरीया) दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन जानेवारी 2018 पर्यंत कार्यरत.
  • 2018 मध्ये सप्लाय टिममध्ये उप-कमांडर पदावर बढती
  • 2018 पासून आतापर्यंत सप्लाय टिम उप-कमांडर (भैरमगड एरीया) पदावर कार्यरत.

दाखल गुन्हे

चकमक : 02

  • 2017 मध्ये छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील मिरतूर जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग.
  • 2022 मध्ये छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील तिम्मेनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग.

आत्मसमर्पित होण्याची कारणे

  • माओवादी दलामध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून, स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं जात नाही.
  • दलामधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, माओवादी चळवळीकरीता पैसे गोळा करावे लागतात. पण, प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा वरिष्ठ माओवादी स्वत:साठीच वापरतात, जनतेच्या विकासासाठी कधीच पैसे वापरले जात नाही.
  • वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
  • दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही वैवाहीक स्वतंत्र आयुष्य जगता येत नाही. 
  • गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे. 
  • वरीष्ठ माओवादी पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.

शासनाने जाहिर केलेलं बक्षीस

महाराष्ट्र शासनाने गणेश गट्टा पुनेम याच्यावर सहालाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र आणि राज्य शासनाकडुन गणेश गट्टा पुनेम याला एकुण 5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

14 जहाल माओवाद्यांचं आत्मसमर्पण

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकूण 14 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केलं आहे की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget