Sindhudurg Crime : विदेशी महिलेला सिंधुदुर्गातील जंगलात साखळदंडाने बांधलं, गुराख्यानं पाहिलं अन् पोलिसांना सांगितलं
Sindhudurg News : साखळदंडाने बांधण्यात आलेली महिला ही तामिळनाडूमधील रहिवासी असून ती मूळची अमेरिकन नागरिक असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून रोणपाल जंगलात एक विदेशी महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. एका गुराख्याच्या जागरूकतेमुळे ही घटना उघडकीस आली. या महिलेची सुटका करण्यात आली असून तिच्यावर आता सावंतवाडी कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास (Sindhudurg Crime) सुरू केला असून अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
तामिळनाडूमधील रहिवासी असलेली ही महिला मूळ अमेरिकन नागरिक असल्याचं देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे. तिच्या उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंध्याला लॉक करण्यात आले होते. तीन दिवस उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती.
सोनुर्लीतील काही गुराखी गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना या महिलेचा आवाज आला. त्यानंतर त्या गुराख्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला साखळदंडातून सोडवून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.
ही बातमी वाचा :