'वेब सीरिज'च्या नावावर तरुणींची पॉर्नफिल्म बनवणाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या बेड्या
पॉर्न साईट आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून अश्लील चित्रफितींचा व्यवसाय करणाऱ्या दोन अभिनेत्यांसह पाच जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून हे सर्व बॉलिवूडशी संबंधित आहेत.
!['वेब सीरिज'च्या नावावर तरुणींची पॉर्नफिल्म बनवणाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या बेड्या five people arrested obscene acts with Strugglers in the name of getting a role in web series TV serial 'वेब सीरिज'च्या नावावर तरुणींची पॉर्नफिल्म बनवणाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या बेड्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07005957/site.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनय क्षेत्रात नशीब आजमावायला अनेक कलाकार मुंबईची वाट धरतात. मात्र, प्रत्येकालाच या क्षेत्रात यशस्वी होता येतं असं नाही. या कलाकारांचा अनेकदा फायदा उठवला जातो. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे.
वेबसिरीज, शॉर्ट फिल्म तसेच टीव्ही मालिकांमध्ये काम देतो असे सांगून अभिनयाच्या क्षेत्रात नशीब आजमाविण्यासाठी मुंबईत येणाऱ्या तरुणींच्या अश्लील चित्रफिती तयार करणाऱ्या एका पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. मढ बीचवरील एका बंगल्यात छापा टाकून पोलिसांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे.
बलात्कार पीडितेची ओळख पटेल अशी कुठलीही कृती करु नका, औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश
पॉर्न साईट आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून अश्लील चित्रफितींचा व्यवसाय करणाऱ्या दोन अभिनेत्यांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून हे सर्व बॉलिवूडशी संबंधित आहेत. अभिनयाची आवड असलेले अनेक तरुण आणि तरुणी मुंबईत येत असतात. अभिनय क्षेत्रात संधी मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. याच परिस्थितीचा पुरेपूर फायदा बॉलिवूडशी संबंधित काही मंडळी घेत असून उपनगरात बंगले भाड्याने घेऊन त्यांच्या अश्लील चित्रफिती बनवल्या जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला मिळाली.
प्रभारी पोलिस निरीक्षक केदारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धीरज कोळी, सहायक निरीक्षक लक्ष्मीकांत साळूंखे, सुनील माने, अमित भोसले, योगेश खानुरे, अर्चना पाटील, सोनाली भारते यांच्या पथकाने मढ बीचवरील ग्रीन पार्क बंगल्यात छापा टाकला. यावेळी पलंगावर एका अश्लिल चित्रफितीचे शूटिंग सुरु होते. पोलिसांनी हे करणाऱ्या पाच जणांना बंगल्यातून अटक केली. यामध्ये दोन अभिनेता, एक ग्राफिक डिझायनर महिला, फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)