मोठी बातमी! बारामतीच्या निंबुत शर्यतीचा बैल खरेदीच्या व्यवहारातून गोळीबार, एक जण गंभीर जखमी
Baramati Crime: बारामतीच्या निंबुत गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारातून गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे.
Baramati Crime News : बारामती : बारामतीच्या (Baramati News) निंबूत (Nimbut Village) इथे गोळीबार (Firing) झाला. शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारातून काल रात्री गोळीबार झाल्याची माहिती मिळतेय. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात शर्यतीच्या बैलाचा व्यवहार झाला होता. रणजीत निंबाळकर बैल परत आणायला गेले असताना गोळीबार झाला, ज्यात निंबाळकर जखमी झाले आहेत.
बारामतीच्या (Baramati Crime News) निंबुतमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारातून झाला गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात शर्यतीच्या बैलाचा व्यवहार झाला होता. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर बैल परत आणण्यासाठी निंबाळकर गेले होते. त्यावेळी वाद झाला आणि याच वादातून त्यांच्यावर गोळीबार झाला. गोळीबारात रणजित निंबाळकर गंभीर जखमी झाले आहेत. काल (गुरुवारी) रात्री उशीरा गोळीबार झाला.
नेमकं घडलं काय?
शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे बारामती तालुक्यातील निंबुत येथे गोळीबार झाला आहे. या गोळीबारात रणजीत निंबाळकर हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या संदर्भात अंकिता रणजीत निंबाळकर यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे आणि तीन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार एक वर्षांपूर्वी सर्जा हा बैल निंबुत येथील गौतम काकडे यांच्याकडून 61 लाख रुपयांना रणजीत निंबाळकर यांनी विकत घेतला होता. त्यानंतर 24 जून 2024 रोजी रणजीत निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजी काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला. यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी पाच लाख रुपये दिले होते. उर्वरित 32 लाख रुपये येणं बाकी होते. दरम्यान, व्यवहार झाला, त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातील बुध येथून त्यांच्या घरी निंबुतला नेला. उर्वरित पैसे आणण्यासाठी गेले असताना त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यावरून रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. रंजीत निंबाळकर यांच्यावरती पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.