एक्स्प्लोर

Eknath Khadse: मोठी बातमी: एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, खडसे पिता-कन्येविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Eknath Khadse: जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात एकनाथ खडसे आणि शारदा खडसे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. साखर कारखान्याच्या नावाखाली महार वतनाची जमीन खरेदी करून फसवणूक केल्याचा आरोप.

Eknath Khadse: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे (Sharda Khadse) यांच्याविरोधात जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या महार वतनाच्या जमिनी हडपल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Eknath Khadse: नेमके प्रकरण काय?

हे प्रकरण 2002 सालातील आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील गट क्रमांक 122 ही महार वतनाची जमीन चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती. फिर्यादीनुसार, एकनाथ खडसे यांनी या परिसरात 'तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना' सुरू करण्याचे आमिष दाखवून ही जमीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. जमिनीचा चांगला मोबदला आणि कुटुंबातील सदस्यांना कारखान्यात रोजगार देण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते.

Eknath Khadse: अशिक्षितपणाचा फायदा आणि कागदपत्रांत खाडाखोड 

तक्रारदार चमेलाबाई तायडे यांच्या म्हणण्यानुसार, खडसे यांनी त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत 51 हजार रुपये आगाऊ दिले आणि सर्वांचे अंगठे घेऊन बोदवड दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी केली. मात्र, अनेक वर्षे उलटूनही तिथे कारखाना उभारला गेला नाही. 2025 मध्ये कुटुंबाने या जमिनीची माहिती काढली असता, ही जमीन कारखान्याच्या नावावर नसून शारदा एकनाथ खडसे यांच्या वैयक्तिक नावावर असल्याचे समोर आले.

Eknath Khadse: खरेदीखतात फेरफार केल्याचा आरोप

11 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा मूळ खरेदीखताची प्रत तपासण्यात आली, तेव्हा त्यात धक्कादायक फेरफार दिसून आले. खरेदीखतामध्ये जिथे 'तापी-पूर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज' असे नाव होते, तिथे खाडाखोड करून 'शारदा एकनाथ खडसे' असे नाव लिहिल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तायडे कुटुंबाने रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

Eknath Khadse: एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखल

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीअंती चमेलाबाई तायडे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात एकनाथ गणपत खडसे, शारदा एकनाथ खडसे, मध्यस्थ सुधाकर पाटील आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी-कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून, अनेक वर्षांनंतर उघडकीस आलेल्या या जमिनीच्या व्यवहारामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा 

Parth Pawar Meet Raj Thackeray: पार्थ पवार अचानक राज ठाकरेंच्या भेटीला, अजितदादांच्या मुलाशी मनसेप्रमुखांची दीड तास गहन चर्चा; भेटीचे कारण गुलदस्त्यात

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget