धक्कादायक! कौटुंबिक वादातून तिघांनी धारदार शस्त्रानं तरुणाचं लिंग कापलं, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Dombivli Crime News: डोंबिवलीमध्ये घडलेल्या घटनेनं खळबळ माजली आहे. कौटुंबिक वादातून तिघांनी धारदार शस्त्रानं तरुणाचे लिंग कापलं असून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Dombivli Crime News: डोंबिवलीत (Dombivli News) एका घटनेनं खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून तीन जणांनी धारदार शस्त्रानं तरुणाचं लिंगच कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.
काल (मंगळवारी) रात्रीच्या सुमारास डोंबिवली गोळवली परिसरात घडलेल्या एका घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवलीमधील गोळवली परिसरात कौटुंबिक वादातून मोठं भांडण झालं. याच भांडणातून तीन तरुणांनी रागाच्या भरात एका तरुणाचं लिंग कापल्याची घटना घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोनू राम, करण राम, सुरेंद्र राम या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पीडित तरुण संजय कुमारला मुंबईतील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.
डोंबिवलीमधील गोलवली परिसरात एका चाळीत संजय कुमार, सोनू राम, करण राम, सुरेंद्र राम हे चार जण एका भाड्याच्या खोलीत राहत होते. हे चौघे मूळचे उत्तरप्रदेश येथील आहेत. हे चारही जण गोळवळी जवळ असलेल्या एमआयडीसीमधील एका कंपनीत काम करत होते. संजय कुमार याचे सोनू, करण, सुरेंद्र यांच्यासोबत कौटुंबिक वाद होते. काल रात्रीच्या सुमारास चौघंही घरी असताना पुन्हा त्यांच्या कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादातून संतापलेल्या सोनू, करण, सुरेंद्र याने संजयकुमार याला बेदम मारहाण केली. हे तिघे इथेच थांबले नाही तर त्यांनी सुरेंद्र आणि करण यानं संजयकुमार याला पकडलं आणि सोनूनं धारदार शस्त्रानं संजयकुमार यांचं लिंग कापलं. गंभीर जखमी झालेल्या संजयकुमार याला करण आणि सोनुनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सोनू, करण, सुरेंद्र हा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना ताब्यात घेतलं असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :