एक्स्प्लोर

Shirish Valsangkar : डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्या प्रकरणातील महिलेची पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं, चौकशीवेळी नेमकं काय घडलं?

Shirish Valsangkar : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने-मुसळे हिला सोलापूर जिल्हा न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Shirish Valsangkar : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने-मुसळे हिला सोलापूर जिल्हा न्यायालयाने (Solapur Court) आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आणि तपासासाठी आवश्यक माहिती मिळवण्यासाठी ही कोठडी वाढवण्यात आल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आरोपी मनीषा माने हिला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी तपाससंबंधी महत्त्वाचे मुद्दे न्यायालयात मांडले. पोलिसांनी सांगितले की, वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमधील तब्बल 27 कर्मचाऱ्यांनी आरोपी मनीषा मानेविरोधात तक्रारी दाखल केल्या असून, त्या तक्रारींची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. तसेच, आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचाही दावा पोलिसांनी केला.

दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी

दुसरीकडे, आरोपीचे वकील वकील अॅड. प्रशांत नवगिरे युक्तिवाद करताना सांगितले की, पोलिसांकडून कोठडीसाठी सांगितली गेलेली कारणे जुनीच असून, नव्याने कोठडी देणे आवश्यक नाही. दोन्ही बाजूंनी सादर केलेल्या युक्तिवादानंतर, मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी आरोपी मनीषा माने हिला दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली.

मनीषा माने-मुसळे यांच्या विरोधात तक्रारी दाखल 

दरम्यान, डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत असून, हॉस्पिटलमधील अनेक कर्मचाऱ्यांनी आरोपी मनीषा माने-मुसळे यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलिस तपास सुरू आहेत. याशिवाय फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर, शोनाली वळसंगकर आणि इतर संबंधित व्यक्तींचेही जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून, लवकरच डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या खऱ्या कारणांचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कोण होते डॉ. शिरीष वळसंगकर? 

डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापूरमधील सुप्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. त्यांचे वय ६९ वर्षे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस’ हे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालय उभारण्यात आले. 1999 साली हे हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी कार्यरत झाले. डॉ. वळसंगकर यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथे पूर्ण केले. त्यानंतर डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून त्यांनी एम.बी.बी.एस. व एम.डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून एम.आर.सी.पी. (यूके) ही पदवी मिळवली. देशातील अग्रगण्य मेंदूविकार तज्ञांपैकी एक म्हणून त्यांची ख्याती होती. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांतील रुग्णांसाठी एसपीएम न्यूरो हॉस्पिटल हे आशेचे केंद्र ठरले आहे. या रुग्णालयात न्यूरोलॉजीशी संबंधित निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि संशोधन यासाठी आधुनिक उपकरणे व दर्जेदार सुविधा उपलब्ध आहेत.

आणखी वाचा 

Shrish Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र, मुलाने अन् सुनेने पोलीस चौकशीत काय सांगितलं?

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'

व्हिडीओ

Special Report Greenland : ग्रीनलँडवर अमेरिकेची वक्रदृष्टी का? काय आहे ग्रीनलँडचा इतिहास?
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
Pakistan : आयसीसीनं बांगलादेशवर अन्याय केला, ...तर आम्ही देखील टी 20 वर्ल्ड कप खेळणार नाही, मोहसीन नक्वींचं वक्तव्य
बांगलादेशवर अन्याय होतोय, पाकिस्तान सरकारनं आदेश दिल्यास वर्ल्ड कप खेळणार नाही : मोहसीन नक्वी
Embed widget