Harshit Rana Ind vs Eng Test : इंग्लंडमध्येच थांब... BCCI चा गंभीरच्या 'लाडक्या'ला थेट आदेश, टीम इंडियात होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये दाखल झाला असून अंतिम तयारी सुरू आहे.

India vs England Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये दाखल झाला असून 18 सदस्यीय ताफ्यासह अंतिम तयारी सुरू आहे. मात्र, पहिल्या कसोटीपूर्वीच बीसीसीआयकडून एका मोठ्या बदलाची शक्यता चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत अ संघात असलेल्या हर्षित राणाला थेट मुख्य कसोटी संघात सामावून घेण्याचा विचार सुरू आहे. विशेष म्हणजे, तो टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरचा लाडका मानला जातो.
भारत अ संघाने इंग्लंड लायन्ससोबत दोन सराव सामने खेळले, त्यानंतर भारत अ संघ आणि टीम इंडियामध्ये एक इंट्रा-स्क्वॉड सामनाही झाला. भारत अ संघात सरफराज खान, ऋतुराज गायकवाड, अंशुल कंबोज, खलील अहमद आणि हर्षित राणा सारखे खेळाडू उपस्थित होते.
हर्षित राणाची टीम इंडियात होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री?
वृत्तानुसार, हर्षित राणाला मुख्य संघात समाविष्ट केले जाऊ शकते. राणा इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सराव सामन्यात खेळला. या दरम्यान त्याने एक विकेट घेतली. पण नेट्समध्ये त्याने केलेली प्रभावी गोलंदाजी, त्याचा संयम आणि फिटनेस पाहता, त्याला कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय संघात जसप्रीत बुमराह, आकाशदीप, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा असे वेगवान गोलंदाज आधीच आहेत.
🚨Harshit Rana to stay back with Team India in UK🚨
— Cricketism (@MidnightMusinng) June 16, 2025
(Indian Express)#INDvsENG #ENGvsIND pic.twitter.com/Xl0B7uEret
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हर्षित राणाने केलं पदार्पण
23 वर्षीय हर्षितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताकडून कसोटी पदार्पण केले. त्याने दोन सामन्यांमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. 13 सामन्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्याने 48 विकेट्स घेतल्या आहेत. तो चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचाही भाग होता.
18 वर्षांपासून भारताने इंग्लंडमध्ये जिंकलेली नाही कसोटी मालिका...
भारतीय संघाने गेल्या 18 वर्षांपासून इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकलेली नाही. भारतीय संघाने शेवटची 2007 मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार राहुल द्रविड होता.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल.





















