3 राज्यात गुंगारा दिला, संगमनेरजवळ पोलिसांनी पाठलाग करुन ठोकल्या बेड्या, गुंड गणेश मारणे कसा पकडला?
Sharad Mohol Case : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील प्रमुख आरोपी गुंड गणेश मारणे याला (Sharad Mohol Case) पुणे पोलिसांनी बुधवारी रात्री मोशी टोल नाक्याजवळ बेड्या ठोकल्या.
Sharad Mohol Case : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील प्रमुख आरोपी गुंड गणेश मारणे याला (Sharad Mohol Case) पुणे पोलिसांनी बुधवारी रात्री मोशी टोल नाक्याजवळ बेड्या ठोकल्या. 5 जानेवारी रोजी गुंड शरद मोहोळ याला कोथरुडजवळ गोळ्या झाडून खून केला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली होती. 17 जणांविरोधात मोक्का (Pune Police MCOCA Action)लावला आहे, तर आतापर्यंत 15 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी रात्री आरोपी गणेश मारणे याला पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले. गणेश मारणे (Ganesh Marne) याला याने पोलिसांना अनेकदा गुंगारा दिला होता. त्याने तीन राज्यात पोलिसांना सुगावा लागू दिला नव्हता.
तीन राज्यातून गुंगारा -
शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांनी तपास वेगाने सुरु केला होता. याप्रकरणात अनेकांना अटक केली. यातील प्रमुख आरोपी गुंड गणेश मारणे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं रवाना केली होती. पण प्रत्येकवेळा त्याने पोलिसांना गुंगारा दिला. तीन आठवड्यांपासून पोलीस गणेश मारणेचा पाठलाग करत होते. गणेश मारणे तुळजापूर परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तूळजापूरमध्ये शोधमोहीम सुरु केली, पण गणेश मारणे याने कर्नाटकात पलायन केले. गुन्हे शाखेचं एक पथक तात्काळ कर्नाटकात गेले पण तोपर्यंत गणेश मारणे याने केरळ गाठलं होतं. गुन्हे शाखेचं पथकाने केरळमध्येही जात त्याचा तपास सुरु केला पण अट्टल गुंड गणेश मारणे याने तोपर्यंत ओडीशा गाठलं. गुंड गणेश मारणे हा ओडिशामधून नाशिकमध्ये आला. याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मग फिल्डिंग लावली. पोलिसांनी नाशिकमधूनच गणेश मारणेचा पाठलाग सुरु केला. टॅव्हल्सच्या चाचपणी केली. अखेर मारणे आपल्या साथीदारासह मोटारीतून जात असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांनी फिल्डिंग लावत त्याला बेड्या ठोकल्या. मोशी टोल नाक्याजवळ स्पईन रस्ता परिसरात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गणेश मारणे याला बेड्या ठोकल्या.
चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे बेड्या ठोकल्या -
पोलिस आयुक्त रितेश कुमार, प्रभारी पोलिस सहआयुक्त रामनाथ पोकळे, गुनेहे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या सुचनेनुसार खंढणी विरोधी पथकाचे वरिष्ट निरीक्षक प्रताप मानकर, अजय वाघमारे आणि त्यांच्या पथकालीत इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. शरद मोहोळ याच्या हत्येनंतर गणेश मारणे फरार होता. तीन राज्यात गुंगारा दिल्यानंतर अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे हा घटनाक्रम घडलाय.
मुख्य सूत्रधार -
शरद मोहोळ हत्याप्रकरणात विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे प्रमुख सुत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. मोहोळ याच्या हत्याआधी मारणे आणि शेलार यांची मीटिंग घेतली होती. शरद मोहोळ यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी त्यावेळी मारणेचे नाव घेतले होते. त्यामुळे गणेश मारणेचा पोलिसांनी कसून शोध घेत होते.
जामीनासाठी कोर्टात धाव, पण -
गणेश मारणे याने पोलिसांना गुंगारा देऊन पुणे सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. शरद मोहोळ यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या मूळ आरोपींमध्ये मारणेचं नाव नव्हतं. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पहिल्या रिमांडमध्ये मारणे फरारी म्हणून दर्शवले नाही, त्यामुले त्याला अटकपूर्व जामीन द्यावा, अशी मागणी मारणेच्या वकिलाने केली होती. पण मोहोळवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी आरडाओरड करताना मारणेचे नाव घेतले असा युक्तीवाद सरकारी वकिलाने केला. त्यानंतर आता मारणेला पोलिसांनी पाठलाग करत बेड्या ठोकल्या.
आणखी वाचा :