अनैतिक प्रेमसंबंध माहिती झालेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी, प्रियकराच्या मदतीने तिने काढला काटा
देगलूर तालुक्यातील कुडली येथील खून प्रकरणाचा एक महिन्या नंतर छडा. गावातील महिलेचे तरुणासोबत असलेले अनैतिक प्रेमसंबंध माहित झालेल्या तरुणाने त्या महिकडे शरीरसुखाची मागणी केली होती.
नांदेड : गावातील तरुणाचे महिलेसोबत असलेल्या अनैतिक प्रेमसंबंध माहिती झाल्याने त्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या तरुणाचा प्रियकराच्या मदतीने खून करण्यात आला आहे. देगलूर तालुक्यातील कुडली येथे महिन्यापूर्वी ही घटना घडली. कुडली येथील तरुण जगदीश जाधवच्या मृत्यूप्रकरणी अखेर जवळपास दीड महिन्यानंतर मरखेल पोलिसांनी दोन प्रेमवीरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
यातील मृत जगदीश हणमंतराव जाधव (वय 27) हा तरुण 1 जानेवारी रोजी रात्री 11च्या सुमारास घरातून बाहेर गेला. मात्र, परत आला नव्हता. घरच्या मंडळीनी शोधाशोध करूनही मिळून आला नसल्याने मरखेल पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली होती. यानंतर 26 जानेवारी रोजी जगदीश याचा मृतदेह मिळाला. याप्रकरणी मरखेल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरण तपासावर ठेवले होते.
मृत जगदीशची महिलेकडे शरीरसुखाची मागणी दरम्यान कुडली गावातील शुभम मोहनराव चिलमपाडे (वय 22) व अनुसया संतोष गोंदे (वय 32) या दोघांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती मृत जगदीश जाधव यास होती. जगदीश अनुसया हिस ब्लॅकमेल करीत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत होता. तू तसे न केल्यास तुमचे प्रेमसंबंध सगळ्या गावाला सांगण्याची धमकी देत असे. या कारणामुळे संतापलेल्या शुभम व अनुसया यांनी जगदीशला 1 जानेवारीला मध्यरात्री कुडली शिवारात बोलावून मिरचीची पूड टाकून, गुप्तांग-तोंडावर लाथा मारून पायाने गळा घोटला. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून मृतदेह गावातील महिला चंदरबाई जाधव यांच्या शेतात नेऊन टाकले.
दोघेही आरोपी ताब्यात मरखेलचे पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार यांच्या टीमने या प्रकरणात सायबर सेलचे पोलीस कर्मचारी महेश बडगू यांच्या तांत्रिक साहाय्याने या प्रकरणातील धागेदोरे मिळविले. त्यावरून शुभम चिलमपाडे यास बोरगाव (जिल्हा लातूर) तर अनुसया गोंदे हिस ममदापुर (कर्नाटक) येथून ताब्यात घेतले व उपरोक्त दोघांवर खुनाचा नोंदवला आहे.