एक्स्प्लोर

Cyber Attack : सैन्यासाठी 'ग्रेनेड्स' बनविणाऱ्या नागपुरातील सोलर समूहावर सायबर हल्ला; संवेदनशील डेटा चोरी, तपास CBI कडे?

'ब्लॅक कॅट' नावाच्या नावाच्या हॅकर्स ग्रुपने हा हल्ला केला आहे. या विषयावर संरक्षण दलाचे अधिकारी आणि नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांचीदेखील बैठक झाली. याचा CBI कडे सोपविला जाण्याची शक्यता आहे.

Nagpur Compnay Making Military Weapons Hit by Hackers : देशातील आघाडीची स्फोटके उत्पादक कंपनी असलेल्या सोलर ग्रुपवर 'सायबर हल्ला झाल्याची बाब समोर आली आहे. अज्ञात हॅकर्सनी हा हल्ला केला असून संवेदनशील डेटा चोरला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. सोलर ग्रुपकडून भारतीय सैन्यासाठीदेखील 'मल्टिमोड ग्रेनेड्स' बनविण्यात येतात. या पार्श्वभूमीवर ही घटना सुरक्षा यंत्रणांनी गंभीरतेने घेतली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलर ग्रुपवर मागील आठवड्यात हा सायबर हल्ला झाला. हॅकर्सने त्यात कंपनीचा महत्त्वाचा डेटा चोरला. त्यात कंपनीच्या माहितीसह संरक्षणविषयक माहिती आणि ड्रॉइंग्जचा समावेश होता. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना सूचना दिली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल याचा तपास सुरू केला आहे. सोलर ग्रुपतर्फे औद्योगिक स्फोटकांसह भारतीय सैन्यासाठीही अनेक स्फोटके आणि निगडीत बाबींचे उत्पादन करण्यात येते. याशिवाय 'मल्टिमोड ग्रेनेड्स' देखील बनविण्यात येतात. यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. यासंदर्भात आमच्याकडे तक्रार आली असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायबर सेलच्या पथकाकडून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

90 एमबी डाटाची चोरी?

'सोलार इंडस्ट्रीज कंपनी'चे संकेतस्थळ हॅक करून त्यातून सायबर हॅकरने जवळपास 90 एमबी डाटा चोरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, कंपनीद्वारे 50 एमबी डाटा चोरण्यात आल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, यापैकी बहुतांश डाटा कंपनीद्वारे पुन्हा मिळविण्यात आला असल्याचेही समजते. मात्र, देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे दिसून येते.

तपास 'सीबीआय'कडे?

प्राप्त माहितीनुसार, 'ब्लॅक कॅट' नावाच्या नावाच्या हॅकर्स ग्रुपने हा हल्ला केला आहे. या विषयावर संरक्षण दलाचे अधिकारी आणि नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांचीदेखील बैठक झाली आहे. या प्रकरणाचा तपास 'सीबीआय'कडे सोपविला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ग्रुपचे संकेतस्थळ बंद

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा अतिशय संवेदनशील डेटा हॅकर्सच्या हाती लागला असण्याची शक्यता आहे. या प्रकारानंतर सोलर ग्रुपचे संकेतस्थळदेखील बंद झाले असून साइट अंडर मेन्टेनन्स असा संदेश येत आहे. हॅकर्सकडे यातील डेटा परत मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात सोलर ग्रुपचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Teachers Constituency Election : गाणार यांची हॅट्रीक की परिवर्तन होणार? शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा आज निकाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget