फार्म हाऊसमध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपींना आश्रय, पाच जणांवर गुन्हा दाखल; तिघांना बेड्या
Crime : छापेमारीत गंभीर गुन्ह्यातील तीन आरोपीना अटक केली आहे. सोहम अनिल पवर रा. उल्हासनगर यश सुरेश पवार रा. उल्हासनगर धीरज हिरिश रोहेरा रा. उल्हासनगर असे अटक आरोपींची नावे आहेत.
Crime News Update : उल्हासनगर शहरातील एका तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर प्रकरणातील पाच आरोपींना आपल्या माळशेज घाट भागातील निसर्ग रम्य असलेल्या करंजाळे गावाच्या हद्दीतील फार्म हाऊसमध्ये आश्रय दिला होता. उल्हासनगर पोलिसांनी फार्म हाऊसवर छापेमारी करत फार्म हाऊसची मालकीण गीता खरे यांच्यासह चार जणांवर बिएनएस कायदाच्या नवीन कलमानुसार गुन्हा दाखल केला. गीता खरे असे मालकीणचं नाव आहे. तर तिच्यासह फार्म हाऊसचा मॅनेजर प्रतीक जनार्दन ठाकरे (रा. कल्याण) आणि सुरक्षा रक्षक रुतिक उर्फ अटल अनिल शुक्ला रा. म्हारळ, उल्हासनगर, गोपाळ सत्यवान पाटील रा. म्हारळ ,सुमीत सत्यवान सैनी (रा. योगीधाम, कल्याण), असे इतर आरोपींची नावे आहेत. खळबळजनक बाब पोलिसांच्या फार्म हाऊसच्या छापेमारीत गंभीर गुन्ह्यातील तीन आरोपीना अटक केली आहे. सोहम अनिल पवर रा. उल्हासनगर यश सुरेश पवार रा. उल्हासनगर धीरज हिरिश रोहेरा रा. उल्हासनगर असे अटक आरोपींची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे फार्म हाऊसची मालकीण गीता खरे ह्या डोंबिवलीतील एका प्रसिद्ध सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी असल्याचे समोर आपल्याने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्यात एका तरुणावर जीवेघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न तीन ते चार जणांनी केला होता. या प्रकरणातील आरोपी घटनेच्या दिवसापासून गुन्हा करून फरार झाले होते. उल्हासनगर पोलीस पथक आरोपींचा शोध घेत असताना . या गंभीर गुन्ह्यातील आरोपी माळशेज घाटातील ओतुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजाळे गावाच्या हद्दीत असलेल्या फार्म हाऊस मध्ये लपून बसले असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे साहाय्यक पोलीस निरीक्षक पत्रे, उपनिरीक्षक समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक करंजाळे येथे पोहचले. रात्रीच्या वेळेत ओतुर पोलिसांच्या मदतीने उल्हासनगर पोलिसांंनी सापळा रचून छापेमारी केली. त्यावेळी फार्म हाऊसमध्ये १५ जण होते. त्यापैकी सहा इसम पोलिसांना पाहून पळून गेले. फार्म हाऊसच्या मॅनेजर प्रतीक ठाकरे यांना पोलिसांनी या फार्म हाऊसवर आरोपींची नावे वाचून दाखवून ते येथे राहतात का म्हणून विचारणा केली. प्रतीकने अटल शुक्ला याच्या सूचनेवरून सोहन पवार, धीरज रोहेरा, यश पवार येथे राहत आहेत असे सांगितले. हेच गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांंनी त्यांना ताब्यात घेऊन उल्हासनगर येथे आणून अटक केली.
दरम्यान, गुन्हा दाखल झालेला आरोपी अटल शुक्ला याने मॅनेजर प्रतीक ठाकरे यांना येथे राहणारे तीन तरुण हे उल्हासनगर मधील गंभीर गुन्हयातील आरोपी आहेत. असे माहिती असूनही या आरोपींची फार्म हाऊसमध्ये राहणे, जेवणाची व्यवस्था करणे, अशी सूचना केली होती. त्यामुळे तिघांना या फार्म हाऊसमध्ये आश्रय मिळाला होता, असे पोलीस तपासात उघड झाले. अटल शुक्लाला गोपाळ सत्यवान पाटील (रा. म्हारळ) याने फार्म हाऊसचा संदर्भ दिला होता. तीन जण गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत हे माहिती असुनही त्यांची माहिती पोलिसांपासून लपवली आणि गन्हेगारांना फार्म हाऊसमध्ये आश्रय देण्यासाठी पुढाकार घेतला. ह्या बाबी पोलीस तपासात समोर आल्याने उल्हासनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक . पोलीस निरीक्षक सचिन बबन पत्रे यांच्या तक्रारीवरून (मंगळवार ) ९ जुलै रोजी कलम २१२, ३४ प्रमाणे फार्म हाऊसच्या मालकीणसह उल्हासनगर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हा अधिक तपास पोलीस पथक करीत असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन बबन पत्रे यांनी दिली आहे.