एक्स्प्लोर

Mumbai : धक्कादायक! मुंबईच्या भांडूप परिसरात नऊ वर्षीय मुलीवर तिघांकडून अत्याचार, दोघांना अटक

Mumbai Crime  News : मुंबईतील भांडूप (Bhandup) परिसरात एका नऊ वर्षाच्या मुलीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केलीय.

Mumbai Crime  News : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. भांडूप (Bhandup) परिसरात एका नऊ वर्षाच्या मुलीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या सामूहिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी (Mumbai Police) आतापर्यंत दोन संशयित आरोपींना अटक केली असून यातील आणखी एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा देखील पोलीस शोध घेत आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मुंबईच्या भांडूप (Bhandup) परिसरात राहते. तिच्यावर 2020 ते 22 जून 2022 या कालावधीत तीन लोकांकडून अत्याचार करण्यात आले. सततच्या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने तिच्यासोबत होत असलेल्या घटनेबाबत आपल्या आईला माहिती दिली. त्यानंतर आईने याबाबत भांडूप पोलीस ठाण्यात (Bhandup Police Station) तिघांविरोधात तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी 62 वर्षे आणि 65 वर्षे वयाच्या दोन संशयितांना अटक केली. तर या प्रकरणातील एक आरोपी सध्या फरार आहे. 

पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर भांडूप पोलिसांनी तिघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या 376, 376 (एबी), 376 (2, एन) आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला व प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली. परंतु, तिसरा आरोपी पोलिसांना सापडला नाही. सध्या तो फरार असून लवकरच त्याचा देखील शोध घेतला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून पीडितेवर संशयित तिघे जण अत्याचार करत होते. परंतु, भीतीमुळे पीडितेने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. परंतु, सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेने तिच्यासोबत होत असलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला. आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून आईला धक्काच बसला. परंतु, धीर धरत आईने मुलीकडून याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि भांडूप पोलीस ठाण्यात तिन्ही संशयितांविरोधात तक्रार दिली. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरोधातही विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ या प्रकरणातील दोघांना अटक केली. परंतु, एक जण पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र, त्याला देखील लवकरच अटक करू अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

Bhiwandi News : भिवंडीत सामूहिक बलात्कार; अल्पवयीन मुलीवर तीन जणांकडून अत्याचार 

धक्कादायक! आश्रमात तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नवी मुंबईतील चर्चमधील घटनेने खळबळ  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

One minute One Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 13 नोव्हेंबर 2024 : ABP Majha LiveAshish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी कराBag Checking Case Maharashtra | हेलिकॉप्टरची तपासणी कोण करतात? एफएमटी पथक म्हणजे नेमकं?ABP Majha Marathi News Headlines 5PM 13 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
Embed widget