धक्कादायक! आश्रमात तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नवी मुंबईतील चर्चमधील घटनेने खळबळ
Mumbai Crime News : बेकायदेशीररीत्या चालविण्यात येत असलेल्या आश्रमशाळेवर ठाणे जिल्हा महिला बाल विकास विभागाने कारवाई कर अल्पवयीन 45 मुलांची सुटका केली.
मुंबई : नवी मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आलीय. सीवूड्स मधील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमधील आश्रमात तीन अल्पवयीन मुलींवर अत्याच्यार करण्यात आलेत. याबाबत एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बेकायदेशीररीत्या चालविण्यात येत असलेल्या आश्रमशाळेवर ठाणे जिल्हा महिला बाल विकास विभागाने कारवाई कर अल्पवयीन 45 मुलांची सुटका केली होती. यामध्ये 13 मुलींचा समावेश होता. या मुलींकडे अधिक चौकशी केली असता यातील ती मुलींचे शोषण झाल्याचे समोर आल्यानंतर एनआरआय पोलीस ठाण्यात चर्च विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमध्ये लहान मुले, मतीमंद महिला असून तेथे गैरप्रकार सुरू असल्याची माहिती ठाणे महिला बाल विकास विभागाला मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 45 मुलांची सुटका केली. या सर्वांना उल्हासनगर मधील शासकीय बालगृहात ठेवण्यात आले आहे.
सुटका करण्यात आलेल्या 12 ते 14 वयोगटातील तीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. मुलीच्या अंगाला विक्स आणि तेल लावणे, त्यांना गुगीची गोळी देऊन झोपवून ठेवले जात असल्याचे मुलींनी सांगितले आहे. यातील एका मुलीचा गर्भपात देखील केल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून मुलींच्या पालकांना भेटू न देण्याचे प्रकार समोर आले आहे.
या धक्कादायक घटनेप्रकरणी ठाणे जिल्हा महिला - बाल विकास विभागाने एनआरआय पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून चर्च मधील केअरटेकरला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत. लकरच या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई करू अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
दरम्यान, घटनेने एकच खळबळ उडाली असून पालकांमधून आश्रमाविरोधात संतापा व्यक्त केला जात आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि पालकांमधून होत आहे.
महत्वाच्या बातम्या