एक्स्प्लोर

Crime News: आयपीएस अधिकाऱ्यानंतर हॅकर्सकडून फसवणुकीसाठी राजकीय नेत्यांच्या फोटोचा वापर

Cyber Crime Fraud Case: आयपीएस अधिकाऱ्यांचा फोटोचा वापर करून फसवणूक होत असल्याचे समोर आल्यानंतर आता राजकीय नेत्यांच्या फोटोचा वापर फसवणुकीसाठी होत असल्याचे समोर आले आहे.

Cyber Crime Fraud Case: आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आणि फोटोंचा आधार घेत व्हॉट्सअॅपचा वापर करुन पोलीस कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक (Fraud Case) होत असल्याचे समोर आल्यानंतर आता राजकीय नेत्यांच्या फोटोचा वापर करून फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा फोटो वापर करत वरळीतील एका क्रीडापटूची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. 

याबाबत वरळी कोळीवाड्यातील रहिवासी दिपेश जांभळे यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. दिपेश जांभळे हे कुस्तीपटू आहेत. त्यांना 23 ऑगस्ट रोजी एक व्हॉट्स अॅपवर मेसेज आला. व्हॉट्स अॅपवर मेसेज करणाऱ्या व्यक्तीने प्रोफाइल फोटो म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो ठेवला होता. या आरोपीने तक्रारदार कुस्तीपटू दिपेश जांभळे यांना मेसेज पाठवून पैशांची मागणी केली. आपल्याला एका मित्राला तातडीने 25 हजार रुपये ट्रान्सफर करायचे असून नेटबँकिंग काम करत नसल्याचे म्हटले. त्यामुळे तातडीने 25 हजार रुपये पाठवण्याची विनंती हॅकर्स आदित्य ठाकरे असल्याचे भासवून केली. दिपेश यांना संशय आल्याने त्यांनी तातडीने युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांमध्ये याची तक्रार देण्यात आली. दादर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 511 आणि 419 नुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावाने फसवणूक

मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांचा फोटो आणि नाव वापरुन कोणीतरी व्हॉट्सअॅप चालवत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या व्यक्तीने अनेक पोलिसांना मेसेज करुन अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करुन पाठवण्यास सांगितले. ही बाब दाते यांना समजताच त्यांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि महाराष्ट्र सायबर सेलला तपास करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, "आम्हाला तक्रार मिळाली असून आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. हा आरोपी पोलीस, रेल्वे किंवा इतर कोणत्याही शासकीय विभागात काम करणाऱ्या कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांची फसवणूक करतो. हा सायबर गुन्हेगार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा फोटो, बनावट मोबाईल नंबर वापरुन व्हॉट्सअॅप चालवत आहेत आणि ते त्या नंबरचा वापर करुन त्या विभागातील सर्वात कनिष्ठ लोकांना अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करण्यासाठी आणि त्यांना त्वरित पाठवण्यासाठी मेसेज पाठवत आहेत," असं संजय शिंत्रे यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी बीडमध्ये पोलीस अधीक्षकांचच फेसबुक अकाऊंट हॅक करुन त्याद्वारे पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं एवढंच नाही तर व्हॉट्सअॅपला त्यांचा फोटो डीपी ठेवून एका सायबर गुन्हेगाराने चक्क पोलिसांकडेच पैशाची मागणी केली.ॉ

फसवणूक होते कशी?

हॅकर्स आपले सावज हेरताना कनिष्ठ कर्मचारी, सामान्य कार्यकर्ता-पदाधिकारी यांना हेरतात. त्यानंतर आपण बैठकीत असून पाकिट घरी विसरलो  असल्याचे सांगत अथवा नेटबँकिंग काम करत नसल्याचे मेसेज संबंधित व्यक्तीला करतात. त्यानंतर हे पैसे खात्यावर टाकण्याऐवजी अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास हॅकर्स सांगतात. गिफ्ट कार्ड त्या मोबाइलवर केल्यानंतर हॅकर्स त्याचा वापर फ्रॉड शॉपिंगसाठी करतात किंवा त्याचं रोख रकमेत रुपांतर करतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget