एक्स्प्लोर

राजगुरुनगर प्रकरण! देवाभाऊ आरोपींना फासावर लटकवतील, चित्रा वाघ यांना विश्वास, म्हणाल्या गुन्हेगारांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत

राजगुरुनगरमध्ये (Rajgurunagar) परप्रांतीय 54 वर्षीय नराधमाने चिमुकल्या मुलींवर अत्याचार करुन खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेवर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

Chitra Wagh on Rajgurunagar Crime News : पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये (Rajgurunagar) शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय 54 वर्षीय नराधमाने चिमुकल्या मुलींवर अत्याचार करुन खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात येत आहे. दरम्यान, भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. राजगुरुनगरमध्ये धक्कादायक मनाला अतीव वेदना देणारी घटना घडली आहे. एका नराधमाने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून त्यांचा जीव घेतल्याचे वाघ म्हणाल्या. राज्याचे मुख्यमंत्री आपले देवाभाऊ राज्यातील बहीणींच्या व त्यांच्या लेकींच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस काम करताहेत. या नराधमांच्या फक्त मुसक्या आवळणार नाही तर त्यांना फाशीवर लटकवण्याचं काम करतील हा विश्वास राज्यातील समस्त बहीणींना असल्याचे वाघ म्हणाल्या. 
 
रात्री 8 वाजता पालकांनी पोलिस स्टेशनला मुली हलवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद करत तात्काळ शोध सुरु केला होता. त्यानंतर चार तासांत आरोपीला पकडले. आरोपी या लहानग्या मुलींचा, त्यांच्या परीवाराच्या ओळखीचा होता. या चिमुकल्यांचा परीवार खाली तर आरोपी वरच्या माळ्यावर राहत होता. हा 54 वर्षांचा आरोपी...कुठून ही विकृती समाजात आली याचा खरंच शोध घ्यायला हवा असे वाघ म्हणाल्या.  

95 टक्के घटनांमध्ये ओळखीचे किंवा नातेवाईकच गुन्हेगार निघतात

95 टक्के घटनांमध्ये ओळखीचे किंवा नातेवाईकच गुन्हेगार निघतात. त्यामुळे आता पालकांनी आणि प्रत्येक जबाबदार नागरिकांनी सावध व्हायला हवं. गुन्हा घडण्याआधी गुन्हेगारांच्या नांग्या ठासल्याच पाहिजेत. त्यासाठी सर्वात आधी आपण सावध राहून योग्य ते पाऊल उचलायला हवं असेही चित्रा वाघ म्हणाल्या. राज्याचे मुख्यमंत्री आपले देवाभाऊ राज्यातील बहीणींच्या व त्यांच्या लेकींच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. या नराधमांच्या फक्त मुसक्या आवळणार नाहीत तर त्यांना फाशीवर लटकवण्याचं काम करतील हा विश्वास राज्यातील समस्त बहीणींना असल्याचे वाघ म्हणाल्या. लहानग्या चिमुरडींना परत आणू शकत नाही पण या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण ही सगळे सजग राहू असेही ते म्हणाले. संशयास्पद व्यक्ती संशयास्पद हालचाली आढळल्या तर तात्काळ 112 वर पोलिसांना संपर्क करावा, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच राजगुरू नगरच्या घटनेत चांगल्यात चांगले सरकारी वकील देऊन या हरामखोर आरोपीला फाशीवर लटकवल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही असेही चित्रा वाघ म्हणाल्या. 

महत्वाच्या बातम्या:

Rajgurunagar Crime News: पुण्यात दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार अन् खून; मृतदेह आढळले पाण्याच्या ड्रममध्ये, पोलीस स्टेशनबाहेर नातेवाईकांचा ठिय्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget