Nagpur News : शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठं नुकसान; पोलीस कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल,रुग्णालयात मृत्यूशी झुंज
Nagpur News : नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठं नुकसान झाल्याच्या नैराश्यातून नागपुरातील पोलीस कर्मचार्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केलाय.
Nagpur News : नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठं नुकसान झाल्याच्या नैराश्यातून नागपुरातील पोलीस कर्मचार्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हे कृत्य करणारे पोलीस कर्मचारी सध्या गंभीर जखमी झाले असून अतिशय जखमी अवस्थेत ते रुग्णालयात मृत्यूची झुंज देत असल्याची माहिती पुढे आली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या बंगल्यावर गार्ड ड्युटीमध्ये तैनात असलेले पोलीस कर्मचारी विशाल तुमसरे यांनी आज सकाळी स्वतःच्याच बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. स्वतः पोलीस अधीक्षकांनी विशाल तुमसरेला एम्स रुग्णालयात नेऊन दाखल केले असून सध्या जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहे. तर त्यांची स्थिती गंभीर असल्याचेही बोलले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेअर मार्केट मधील गुंतवणुकीत मोठं नुकसान झाल्यामुळे विशाल तुमसरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खात्रीलायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान या घटणेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
स्कूल बॅग मधून गांजाची तस्करी, विधी संघर्षग्रस्त बालकासह दोघांना अटक
गोंदिया शहराच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एका विधी संघर्षग्रस्त बालकासह दोघांना गांजाची तस्करी करताना गोंदियाच्या रामनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. हे दोन्ही आरोपी ओडिसा राज्यातील असून ते रेल्वे स्थानक परिसरातून बालाघाटकडे जात असताना पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता त्यांच्याकडून स्कूल बॅगमधून 1 लाख 67 हजार रुपये किमतीचा 8 किलो 325 ग्रॅम गांजा आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद केला आहे. देवेंद्र बेहेरा (राहणार उडीसा) आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक (वय 17 वर्,ष राहणार उडीसा) अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भू -करमापकाला लाच घेताना अटक
एका तक्रारदाराच्या प्लॉटची मोजणी करून लवकर कर आकारणी करून देण्यासाठी 80 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या लोणार येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक उमेश पंडित सानप याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात अटक केली आहे. उमेश पंडित सानप यांच्याविरुद्ध लोणार पोलिसात गुन्हा दाखल करून आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या