छत्रपती संभाजीनगरात व्यावसायिकाच्या घरात दरोडा, सोन्या-चांदीसह तब्बल 87 लाख 69 हजार केले लंपास
Chhatrapati Sambhajinagar Robbery: शहरातील सिडको एन भागात व्यावसायिकाच्या घरी दरोडा पडला असून दरोडेखोरांनी कपाट फोडून दागिन्यांसह इतर ऐवज चोरला आहे.
![छत्रपती संभाजीनगरात व्यावसायिकाच्या घरात दरोडा, सोन्या-चांदीसह तब्बल 87 लाख 69 हजार केले लंपास Chhatrapati Sambhajinagar crime news Robbery in businessmen house complaint in CIDCO police station छत्रपती संभाजीनगरात व्यावसायिकाच्या घरात दरोडा, सोन्या-चांदीसह तब्बल 87 लाख 69 हजार केले लंपास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/15/1628b1b98c4901a7bcaef670c630534917210288362071063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chhatrapati Sambhajinagar crime: छत्रपती संभाजीनगरात व्यवसायिकाच्या घरात दरोडा (Robbery) पडला असून दरोडेखोरांनी सोन्या-चांदीसह तब्बल 87 लाख 69 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. शहरातील सिडको एन 1 भागात हा दरोडा पडला असून सिडको पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शहरातील उच्चभ्रू भागात रात्री 9 वाजेच्या सुमारास दरोडा पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दागिन्यांसह रोख रक्कम केली पसार
छत्रपती संभाजी नगरच्या सिडको एन वन भागात दरोडेखोरांनी सोने, हिरे, मोती व चांदीसह दागिने लंपास केले असून तब्बल 87 लाख 69 हजार रुपयांची रक्कमही पसार केली आहे. व्यावसायिकाने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, या दागिन्यांमध्ये त्यांच्या पत्नीला स्त्रीधन म्हणून मिळालेले दागिनेही होते. चाेरीला गेलेल्या ऐवजात सोन्या-चांदीसह हिऱ्याचेही दागिने होते.
कपाट फोडून दागिने लंपास
दरोडेखोरांनी रात्री नऊ वाजेच्या सुमारास व्यवसायिक निखिल मुथा यांच्या घरी दरोडा पडला. यावेळी घरातील सोन्या-चांदीसह लोखंडी कपाट कटरच्या सहाय्याने फोडून कपाटातील दागिनेही लंपास केले आहेत. यात व्यावसायिक निखिल मुथा यांच्या पत्नीला स्त्रीधन म्हणून मिळालेले सोने व हिऱ्याचे दागिने होते.
खिडकीची लोखंडी गज कापून दरोडेखोर घरात
व्यवसायिक व घरातील कुटुंबीय बाहेर खरेदीला गेल्याचे पाहून दरोडेखोरांनी घरातील खिडकीची लोखंडी गज कापून घरात प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. बाहेरून घरी आल्यानंतर घराचे मुख्य गेट खुले दिसून आले व घरातील लाईटही सुरू असल्याचे व्यावसायिकास दिसून आले. यानंतर घरात पाहणी केली असता गोदरेजचे लोखंडी कपाट फोडलेले आढळले. दागिन्यांसह 87 लाख 69 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे लक्षात आले. यानंतर अज्ञात दरोडेखोरांविरोधात व्यावसायिकाने सिडको पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून याबाबत पुढील तपास सुरु आहे.
"खरेदी केल्यानंतर रात्री 09.30 वाजेच्या सुमारास आमचे घरी परत आलो असता आमच्या घराबा मेन गेट उघडे व दिसले व पुढे घरात आलो असता घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला तसेच प्रत्येक रुमचे लाईट चालु झालेले दिसले तसेच आत घारता जावुन पाहता घरातील डाव्या बाजुची रुम मधील दक्षीणेकडील खिडकीचे लोखंडी गज हे चारही बाजूने कटरच्या साहायाने कट केलेले व त्यातुन कोणीतरी चोरट्याने घरात प्रवेश केल्याचे आढळुन आले त्यामुळे आम्ही घरातील कपाटीची पाहणी केली असता एका कपाटात ठेवलेले गोदरेज सेफ लोखंडी तिजोरी त्यातील दागीन्यासह चोरीस गेल्याचे दिसले"
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)