एक्स्प्लोर

आंतरजातीय मुलाशी पळून जाऊन लग्न केल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराट, वडील आणि भावाने घरात घुसत जावयाला भोसकले, शहर हादरले

आंतरजातीय मुलाशी पळून जाऊन लग्न केल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराट, वडील आणि भावाने घरात घुसत जावयाला भोसकल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे

Chhatrapati Sambhajinagar crime news: छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या ऑनरकिलींगच्या (honour killing) घटनेनं शहरातील नागरिक सुन्न झाले आहेत. बालपणीच्या मैत्रीणीवर प्रेम करत दोघांनी पळून जाऊन आंतरजातीय लग्न केलं. याचा राग मनात ठेऊन मुलीच्या वडीलांनी आणि भावाने तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आणि शहरात चांगलीच खळबळ माजली. आंतरधर्मीय विवाहामुळे हत्या केल्याची घटना 'सैराट' सिनेमाप्रमाणे केल्याची कुजबुज शहरभर पहायला मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगरचा इंदिरानगर हा भाग तसा गजबजलेला. या भागातील रहिवासी अमीत साळुंखे याचे त्याच्या बालमैत्रीणीसोबत विद्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांमधूनच त्यांनी पळून जाऊन लग्न केले. आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून या तरुणीच्या वडिलांसह चुलत भावाने चाकूचे वार करत तरुणाला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. या दोघांनी तरुणाच्या पोटात आणि छातीत गंभीर वार केले. परजातीच्या मुलावर प्रेम केल्याने तरुणीच्या कुटुंबाचा या दोघांच्या लग्नाला तीव्र विरोध होता. पुढे अमितच्या कुटुंबीयांनी दोघांना स्वीकारल्याने 2 मे रोजी ते घरी परतले. मात्र, विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही स्वीकारले नव्हते. तर, याउलट विद्याचे वडील आणि चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी देत होते. तरीही तरुणीने पळून जाऊन तरुणाशी लग्न केल्याचा राग मनात धरून मुलीच्या वडिलांनी आणि चुलत भावाने सैराट चित्रपटात दाखवल्याप्रमाणे जावयाची निघृण हत्या केली. यात जखमी झालेल्या तरुणाला गुरुवारी घाटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. 

घरात घुसून चाकूने वार, तरुणाचा मृत्यू

१४ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरानगर भागात घडलेल्या घटनेनंतर गुरुवारी काल या तरुणाचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आपल्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्याचा राग विद्याच्या वडिलांना व चुलता भावाच्या डोक्यात होता. याच रागातून विद्याचे वडील आणि तिच्या चुलत भावाने 14 जुलै रोजी अमितवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अमित खाली कोसळला, त्याच्या पोटात खोलवर वार घुसल्यामुळे तेव्हापासूनच त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, 12 दिवसानंतर अमितशी मृत्यूशी सुरू असलेली झुंज गुरुवारी उपचारादरम्यान अमितचा मृत्यू झाला.

ऑनर किलींगच्या घटनेने शहर हादरले

ऑनर किलिंग च्या घटनेने संभाजीनगरशहर हादरून गेलं आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी वडील गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब  किर्तीशाही हे दोघेही सध्या फरार असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येतआहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. अमितच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. फरार आरोपींना तातडीनं अटक करा अशी मागणी त्यांनी केली आहे. नातेवाईकांकडून जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

हेही वाचा:

केस पकडून फरफटलं, चाकूनं सपासप केले वार; PG मध्ये घुसून तरुणीवर जीवघेणा हल्ला, थरकाप उडवणारा VIDEO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Bhosale Khokya Home News | सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर बुलडोझर, वनविभागाची कारवाई,संपूर्ण व्हिडीओABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08PM 13 March 2025JOB Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय?Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 13 March 2025 7 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Embed widget