एक्स्प्लोर

Crime News : फुकटच्या पाणीपुरीसाठी खुनी हल्ला; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Chhatrapati Sambhaji Nagar : या घटनेत पाणीपुरी विक्रेता जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) एका शुल्लक कारणावरून चक्क चाकू हल्ला करण्यात आला आहे. आम्हाला फुकट पाणीपुरी द्यायची तरच येथे गाडी लावायची, असे म्हणत पाणीपुरी विक्रेत्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत पाणीपुरी विक्रेता जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. तर या प्रकरणी तिघांवर उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापनगर येथे एक पाणीपुरीवाला आपला गाडा लावून, व्यवसाय करायचा. दरम्यान 30 एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सय्यद शहजाद सय्यद अल्लू (रा. फुलेनगर, उस्मानपुरा), शेख अन्सार ऊर्फ इल्ली शेख सत्तार (रा. शहानूरवाडी) आणि शेख शाहरुख ऊर्फ जॉकी शेख वाहिद (रा. उस्मानपुरा) या तिघांनी पाणीपुरी वाल्याला आम्हाला फुकट पाणीपुरी द्यायची तरच येथे गाडी लावायची, असे म्हणत धमक्या दिल्या. तसेच त्या पाणीपुरीवाल्यास शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. तेव्हा या पाणीपुरीवाल्याचे काका पूरणसिंह यादव (रा. शहानूरवाडी) हे भांडण सोडवण्यास आले. तेव्हा या तिघांनी त्यांना पकडून चाकूने भोसकले. त्यामुळे या प्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'तू मेरे साथ क्यू नही रहेता' म्हणत चाकूने वार

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत बायजीपुऱ्यात देखील एकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. 'तू मेरे साथ क्यूँ नही रहेता, जादा मस्ती में आया क्या, तू सोहेल बागवान के साथ क्यूँ रहता है, तुझे और सोहेल को जान से मार दूँगा' असे म्हणून आमेर खान पाशु खान (रा. बायजीपुरा) याने फिर्यादी शेख अबुजर शेख अय्युब (रा. हर्सल) यांच्या मानेवर, हातांवर आणि पाठीवर चाकूने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना 27  एप्रिल रोजी बायजीपुऱ्यात घडली. याप्रकरणी 1 मे रोजी जिन्सी ठाण्यात आमेरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दहा जणांकडून तरुणावर हल्ला

संभाजीनगर शहरात आणखी एकावर हल्ला करण्यात आल्याची घटना देखील समोर आली आहे. "तुझ्या मुलाला बोलावून घे, त्याने चूक केली आहे. त्याला माफी मागायला लावायची आहे,” असे म्हणत दहा जणांच्या टोळक्याने एकावर जीवघेणा हल्ला केला. यात फिर्यादी आरेफ देशमुख (रा. कटकट गेट) यांचा मुलगा अबरार हा गंभीर जखमी झाला. तर त्यांचा मेहुणा जावेद खान यासही चाकू लागला. याप्रकरणी आरेफ यांच्या तक्रारीवरून हुसेन खान ऊर्फ बब्बु, सैफ अब्बास खान, शहबाज हुसेन खान, हुसेन खानचा भाचा सोहेल, फैसल, फुरखान, नातेवाईक साद, रेहान, हारुण यांच्यासह हुसेनच्या जावयाच्या विरोधात जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

आधुनिक लखोबा! पहिली सोडली, दुसरीसोबत लिव्ह इनमध्ये राहत असतानाच तिसरी जाळ्यात ओढली

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget