Chhatrapati Sambhaji Nagar Crime : मोठी बातमी : संभाजीनगरातून अपहरण झालेल्या बिल्डरपुत्राचा शोध लागला, कार अपघातामुळे जालन्यात सापडला
Chhatrapati Sambhaji Nagar Crime : संभाजीनगरातून अपहरण झालेल्या बिल्डरपुत्राचा शोध लागलाय. कार अपघातामुळे अपहरणकर्त्यांसह सात वर्षीय मुलगा जालन्यात सापडला.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : जालना जिल्यातील ब्रम्हपुरी गावातून मुलाचं अपहरण करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात. चिमुकल्या मुलाचं अपहरण करणाऱ्यांना उचलण्यात पोलिसांनी यश आलंय. विशेष म्हणजे चिमुकला मुलगा अपहरण करण्यात आलेल्या कारचा अपघात झाल्यामुळे सापडलाय. संभाजीनगर शहरातून ज्या गाडीतून मुलाचं अपहरण करण्यात आले होते (Chhatrapati Sambhaji Nagar Crime), त्या गाडीचा जालना जिल्ह्यातील भोकरदन जवळ अपघात झाला. त्यामुळे अपहरण प्रकरणातील आरोपी सापडले आहेत. अपघात झाल्यामुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. दरम्यान, या चार आरोपींना संभाजीनगरकडे रवाना करण्यात आले असून मुलगाही सुखरुप आहे.
सेंट्रल मॉलमधून या मुलाचं अपहरण झालं होतं
अधिकची माहिती अशी की, शहरातील नामांकित बिल्डरच्या मुलाचे 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मंगळवारी (दि.5) रात्री अपहरण करण्यात आल्याच समोर आलं होतं. घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावरील सेंट्रल मॉलमधून या मुलाचं अपहरण झालं होतं. जेवल्यानंतर वडील आणि मुलगा फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. वडील पुढे चालत असताना मुलगा सायकलवर मागे होता. दरम्यान, याचवेळी काळ्या रंगाची चारचाकी आली अन् मुलाला वडिलांसमोर उचलून नेले. ही घटना मंगळवारी रात्री 8.40 वाजता सिडको एन-4 मध्ये घडली. दरम्यान, अपहरण झालेल्या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना (Chhatrapati Sambhaji Nagar Crime) यश आलं आहे.
अपहरण झालेल्या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश
जालना जिल्यातील ब्रम्हपुरी गावातून मुलाचं अपहरण करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संभाजीनगर शहरातून ज्या गाडीतून मुलाचं अपहरण केले त्या गाडीचा जालना जिल्ह्यातील भोकरदन जवळ अपघात झाला. त्यामुळे आरोपी सापडले आहेत. अपघातामुळे आरोपींना पकडण्यात यश आले आहे. चार आरोपींना घेऊन संभाजीनगरकडे रवाना करण्यात आलंय, तर मुलगाही सुखरूप असल्याचं समोर आलंय.
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, बड्या बिल्डरच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण, CCTV फुटेजमध्ये काळी कार दिसली#chhatrapatisambhajinagar #CrimeNews #KidnappingCase #CCTVFootagehttps://t.co/mFQYY1Xr7T
— ABP माझा (@abpmajhatv) February 5, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
