Tamil Nadu : तामिळनाडूत भाजप नेत्याची हत्या, मारेकरी फरार
Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये भाजपच्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. बालचंद्र असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव असून ते तामिळनाडूमधील मध्य चेन्नई एससी/एसटी शाखेचे अध्यक्ष होते.
Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये भाजपच्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. बालचंद्र असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव असून ते तामिळनाडूमधील मध्य चेन्नई एससी/एसटी शाखेचे अध्यक्ष होते. चिंताद्रीपेट येथे तीन अज्ञात लोकांनी त्यांची हत्या केली आहे.
पोलीस याबाबत अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. बालचंद्र हे चेन्नईतील सिंधात्रीपेठ येथील रहिवासी होते. ते भाजपच्या एससी-एसटी शाखेचे चेन्नईचे जिल्हाध्यक्ष होते. बालचंद यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) नेमण्यात आले होते.
मंगळवारी रात्री बालचंद्र आणि त्यांचे पीएसओ बालकृष्णन हे समनायकन रस्त्यावर गेले होते. तिथे ते त्यांच्या काही मित्रांशी बोलत होते. यावेळी पीएसओ बालकृष्णन जवळच्या चहाच्या दुकानात चहा घेण्यासाठी गेले. त्याचवेळी तिघांनी बालचंद्र यांना घेरले आणि चाकूने वार करून त्यांनी निर्घृण हत्या करण्यात आली.
Tamil Nadu | BJP's Central Chennai SC/ST wing president Balachandran was killed by three unknown people in Chintadripet. Further investigation is underway: Police Officials
— ANI (@ANI) May 24, 2022
बालचंद्र यांच्यावर वार करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. परंतु, भाजप कार्यकर्त्याच्या मृत्यूने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. 18 मे रोजीही चेन्नईमध्ये दोन भीषण हत्या झाल्या होत्या. या दोन्ही हत्या सीसीटीव्हीत कैद झाल्या होत्या. विरोधी पक्षनेते एडप्पाडी के. पलानीस्वामी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका केली आहे. चेन्नई हे 'हत्यांचे शहर' बनले आहे, कारण गेल्या 20 दिवसांत 18 खून झाले आहेत, असा आरोप पलानीस्वामी यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या