एक्स्प्लोर

Chandrapur Crime : शेतीच्या वादातून पोटच्या मुलीने भावजयीच्या मदतीने आईला संपवलं, मृतदेह जमिनीत पुरुन अंत्यविधीही उरकला

Chandrapur Crime : पोटच्या मुलीने भावजयीच्या मदतीने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली. शेतीच्या वादातून हा खून केल्याचं समोर आलं आहे.

Chandrapur Crime : पोटच्या मुलीने भावजयीच्या मदतीने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. शेतीच्या वादातून हा खून केल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी दोघींनी आईचा मृतदेह जमिनीत पुरुन अंत्यविधी देखील केला. तानाबाई महादेव सावसागडे (वय 65 वर्षे) असं मृत महिलेंच नाव आहे.

चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर इथली ही घटना आहे. शेतीच्या वादातून तानाबाई सावसागडे यांच्या मुलीने आणि सुनेने 3 ऑक्टोबर रोजी नाक-तोंड दाबून खून केला. इतकंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी दोघींनी मृतदेह जमिनीत पुरुन अंत्यविधी देखील केला. 4 ऑक्टोबर रोजी तानाबाई सावसागडे यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या मोठ्या मुलगी रंजना सोनवणे यांना देण्यात आली. परंतु इथे आल्यावर रंजना सोनवणे यांना काहीतरी संशयास्पद  जाणवलं. या सगळ्या प्रकारात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय त्यांला आला. 

मोठ्या मुलीकडून पोलिसात तक्रार
यानंतर रंजना सोनवणे यांनी 5 ऑक्टोबर रोजी सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपली आई बेपत्ता असून तिचा खून झाला असल्याची तक्रार नोंदवली. घरातील व्यक्तींनीच खून केला असावा असं त्यांनी तक्रारीत म्हटलं. या तक्रारीची दखल घेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तानाबाई यांच्या मुलीला आणि सुनेला ताब्यात घेऊ चौकशी केली. सुरुवातीला चौकशीदरम्यान दोघींनीही उडवाउडवीची उत्तरं दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सत्य उघड केलं.

कोणालाही न कळता मृतदेह जमिनीत पुरुन अंत्यविधी उरकला
शेतीच्या वादातून 3 ऑक्टोबर रोजी तानाबाई यांची नाक आणि तोंड दाबून हत्या केल्याची कबुली दोघींनी दिली. या दोघी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी गावात कोणालाही न कळता मृतदेह जमिनीत पुरुन अंत्यविधी देखील उकरला. यानंतर पोलिसांनी आरोपी मुलगी वंदना खाते (वय 35 वर्षे) आणि सून चंद्रकला सावसागडे (वय 40 वर्षे) यांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

शेतात वाटा हवा यासाठी खून
तानाबाई सावसागडे यांच्याकडे शेत आहे. मुलगी वंदना खाते आणि सून चंद्रकला सावसागडे यांना या शेतात वाटा हवा होता. परंतु तानाबाई शेतजमिनीचा वाटा करण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे पोटच्या मुलीने आणि सुनेने रागाच्या भरात तानाबाई यांचा खून केला, असं त्यांनी पोलिसांनी दिलेल्या कबुलीत म्हटलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
Mhada :  ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात येणार?
Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vision Worli : वरळी व्हिजन कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार?Manoj Jarange Beed : मनोज जरांगेंच्या समर्थनात आज बीड बंदची हाक : गंगाधर काळकुटेManoj Jarange Health Update : मध्यरात्री पावणेदोन वाजता उपचार, मनोज जरांगे यांना सलाईनJalna Kreat Competition : इंजिनिअरींग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, 200 महाविद्यालयांचा समावेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
Mhada :  ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात येणार?
Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Maratha- OBC Reservation: मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Nitin Gadkari: 'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
Jalgaon : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
Tirupati Laddu Controversy : प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
Embed widget