एक्स्प्लोर

भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीचे सिंदूर सुरक्षित नाही; पंकज देशमुखांची हत्याच, पत्नीची न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना विनवणी

Pankaj Deshmukh Murder Case : बुलढाणा जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय कुटे यांचे वाहनचालक असलेल्या पंकज देशमुखांची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा दावा त्यांची पत्नी सुनिता देशमुखांनी केली आहे. 

बुलढाणा : पहेलगाममध्ये भगिणींचं सिदूर पुसलं म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवलं. इथे भाजप कार्यकर्त्यांच्या पत्नींचं सिंदूर दररोज पुसलं जातंय. त्यासाठी काय करणार? असा थेट सवाल बुलढाण्याच्या सुनिता देशमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. पहलगाममध्ये तर सोडा, गावातही भाजपचे कार्यकर्ते सुरक्षित नाहीत असंही त्या म्हणाल्या. भाजपचे आमदार संजय कुटे यांचे वाहनचालक असलेल्या पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी पत्नी सुनिता देशमुख यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून भावनिक पोस्ट लिहिली आहे. 

जळगाव जामोदचे भाजपचे कार्यकर्ते आणि भाजप आमदार संजय कुटे यांच्या वाहनचालक असलेल्या पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. 3 मे रोजी पंकज देशमुखांचा मृतदेह एका शेतात सापडला होता. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप पंकज देशमुखांच्या पत्नीने केला आहे. 

Sunita Pankaj Deshmukh facebook Post : काय म्हटलंय सुनिता देशमुखांनी? 

माझे सिंदूर आमच्याच गावात पुसले गेले. मला न्याय हवा. पहलगामचे सिंदूर दिसले आणि जे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद गावात पुसले गेले त्याचे काय? माझे सिंदूर सिंदूर नाही का? माझ्या सिंदूरचे काही मोल नाही का? माझे मिस्टर गेली वीस वर्षांपासून भाजप कार्यकर्ते आहेत.  भाजप कार्यकर्त्याला न्याय मिळेल का? 3 मे 2020 रोजी माझ्या पतीचे निधन झाले. माझी मुलगी फक्त अकरा वर्षांची आहे आणि माझा मुलगा आठ वर्षांचा आहे. त्यांना न्याय मिळेल का? पहलगाम तर दूरचा विषय आहे, गावातही जनता सुरक्षित नाही. 

भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीचे सिंदूर सुरक्षित नाही; पंकज देशमुखांची हत्याच, पत्नीची न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना विनवणी

Pankaj Deshmukh Murder Case Buldhana : काय आहे प्रकरण? 

आ.संजय कुटे यांचे वाहन चालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण आल आहे. 3 मे रोजी जळगाव जामोद येथील बऱ्हाणपूर रोडवरील एका शेतात पंकज देशमुख यांचा मृतदेह रुमालाला लटकलेल्या अवस्थेत व संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्यावेळी पंकज देशमुख यांच्या हातावर पायावर व मानेवर अनेक जखमाही आढळल्या होत्या. 

जळगाव जामोद पोलिसांनी मृतदेहाचं शवविच्छेदन अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात केलं. पंकज देशमुख यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चाही जळगाव जामोद परिसरात सुरू आहे. मात्र आता पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनिता देशमुख यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती व बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याची त्यांनी तक्रार केली आहे. 

जळगाव जामोद पोलिसांचा तपास हा संशयास्पद असून त्यांच्यावर माझा विश्वास नाही असं त्यांच्या पत्नीने स्पष्ट म्हटल आहे. माझ्या पतीच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन गंभीर वळण मिळाल आहे. 

पंकज देशमुख हे गेल्या 20-22 वर्षापासून भाजप कार्यकर्ता होते. तसेच ते जळगाव जामोदचे भाजपा आ. संजय कुटे यांचा वाहन चालक होते. त्यामुळे सुनिता देशमुख यांना नेमका कुणावर संशय आहे? जळगाव जामोद पोलिसांवर सुनीता देशमुख यांचा विश्वास का नाही? पंकज देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याचं सुनीता देशमुख यांना का वाटतं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित राहिले आहे. अलीकडेच बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. बुलढाण्यातही तसेच काही घडलं आहे का? याचा शोध घेण्याचं आव्हान आता बुलढाणा पोलिसांसमोर आहे. 

ही बातमी वाचा: 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..
Laxman Hake :  2029 निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ..हाकेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
AI VS JOB : AI मुळे कोणाच्या नोकऱ्या जाणार? कोण सुरक्षित?
Yawatmal : उर्दू शाळेत गायलं पाकिस्तानी गीत,विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी गीतावर नृत्य केल्याचा आरोप
Sanjay Raut On BJP BMC Mayor : मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर केला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Laxman Hake : अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
Embed widget