एक्स्प्लोर

चंद्रपुरात सत्तांतर... शिवसेनेतून कालच भाजपात प्रवेश आज बाजार समितीवर एकहाती सत्ता; सभापतीपदी राजेंद्र डोंगे

ताजनेंच्या राजीनाम्यानंतर झालेल्या बाजार समितीसाठी आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेंद्र डोंगे यांची 13 विरुद्ध 5 मतांनी निवड करण्यात आली.

चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर राजेंद्र डोंगे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे, येथील बाजार समितीवर असेलली शिवसेना उबाठा गटाची सत्ता उलथावून भाजपने (BJP) बाजार समितीवर एकहाती सत्ता स्थापन केली आहे. शिवसेना उबाठा गटाचे 11 तर काँग्रेसच्या 2 संचालकांनी कालच भाजपात प्रवेश केला होता, या प्रवेशानंतर चंद्रपूर (Chandrapur) भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता भाजपचे कमळ फुलले आहे. भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भास्कर ताजणे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी अविश्वास प्रस्ताव आला होता आणि त्यानंतर भास्कर ताजणे यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप यावेळी ताजणेंनी केला होता.

ताजनेंच्या राजीनाम्यानंतर झालेल्या बाजार समितीसाठी आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेंद्र डोंगे यांची 13 विरुद्ध 5 मतांनी निवड करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपची एक हाती सत्ता स्थापित झाली आहे. विशेष म्हणजे, शिवसेना ठाकरे गटात असलेल्या 11 सदस्यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर काँग्रेसच्या 2 सदस्यांनीही काँग्रेसची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे, येथील बाजार समितीवर भाजपच्या सभापतीपदाचा मार्ग अतिशय सुकर झाला.

आपल्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव यशस्वी होईल या भीतीने माजी सभापती भास्कर ताजने यांनी आधीच राजीनामा दिला होता, हे विशेष. कोणत्याही पक्षात प्रवेश घेण्यासंदर्भात कोणत्याही संचालकांवर अथवा सभापतीवर दबाव नव्हता. किंबहुना हा विषयच कधी कुणामार्फत बोलल्या गेला नाही. भास्कर ताजने यांनी सदर विषयाला घेऊन भाजपात प्रवेश घेण्यास नकार दिल्याने अविश्वास ठराव आणला असल्याचे म्हटले होत. मात्र, स्वतःवरील दोषावर पांघरून घालण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे. सदर अविश्वास कुणाच्या सांगण्यावरून झाला नसून सर्व संचालकांच्या एकमताने पारित झाला आहे. त्यावेळी राजकीय पक्ष, गट आदी न बघता केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उन्नतीकरिता हा निर्णय घेण्यात आला. ताजने यांच्या बाजूने एकही संचालक नाही, यातूनच त्यांच्या विषयीची नाराजी उघड होते, अशी प्रतिक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गजानन उताणे यांनी दिली होती.

ताजनेंच्या कारभारावर नाराजी - डोंगे

मी बांधकाम सभापती असून सुद्धा या अविश्वास प्रस्तावात सहभागी आहे, यात कोणताही पक्षपात नाही. ताजने यांच्या कारभारावरील नाराजीमुळेच सदर अविश्वास प्रस्ताव आणला. पुढील सभापतीची निवड रीतसर सर्व संचालक एकत्र बसून निर्णय घेऊ, असे राजू डोंगे यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यानंतर, आज राजेंद्र डोंगे यांचीच निवड बाजार समितीच्या सभापतीपदावर झाली आहे.

हेही वाचा

राज ठाकरे सपत्नीक 'वर्षा' बंगल्यावर, बाप्पांचे दर्शन; मुख्यमंत्र्यांसोबत 15 दिवसांत तिसरी भेट

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यांनी चंद्रपूर हादरले; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांचा बळी, एकाची रुग्णालयात मृत्यूशी झुंज, नागरिकांमध्ये प्रचंड भीती
वाघाच्या हल्ल्यांनी चंद्रपूर हादरले; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांचा बळी, एकाची रुग्णालयात मृत्यूशी झुंज, नागरिकांमध्ये प्रचंड भीती
Vijay Wadettiwar : गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा हैदोस, विजय वडेट्टीवारांचा संताप, थेट वनमंत्री गणेश नाईकांना फोन फिरवला; म्हणाले, नरभक्षी वाघांना स्थलांतर करा, नाहीतर....
गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा हैदोस, विजय वडेट्टीवारांचा संताप, थेट वनमंत्री गणेश नाईकांना फोन फिरवला; म्हणाले, नरभक्षी वाघांना स्थलांतर करा, नाहीतर....
Bacchu Kadu: बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ, आवाजाच्या नमुन्यासाठी घुग्गुस पोलिसांनी नोटीस धाडली, नेमकं प्रकरण काय?
बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ, आवाजाच्या नमुन्यासाठी घुग्गुस पोलिसांनी नोटीस धाडली, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime News: बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
IND vs NZ : दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय, भारताकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी
दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
Tukaram Mundhe: मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंचं मुलांसोबतचं नातं कसं, काय-काय म्हणाले?
मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, काय-काय म्हणाले?
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Embed widget