एक्स्प्लोर

Cyber Crime : नवे जामतारा...फक्त 'या' 10 जिल्ह्यातून होतात देशातील 80 टक्के सायबर गुन्हे

Cyber Crime News : सायबर गुन्ह्याबाबत आता जामताराला मागे टाकणारे नवीन सायबर क्राईम सेंटर उदयास येत आहेत.

नवी दिल्ली आतापर्यंत झारखंडचे जामतारा आणि हरियाणाचे नूह हे सायबर गुन्ह्यांचे केंद्र म्हणून ओळखले जात होते. आता सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत राजस्थानच्या भरतपूर आणि उत्तर प्रदेशातील मथुरा हे जिल्हेदेखील केंद्रस्थानी आले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरमध्ये सुरू झालेल्या एका स्टार्टअपने आपल्या संशोधनात हा दावा केला आहे. संशोधनानुसार, देशभरातील 80 टक्के सायबर गुन्हे हे टॉप 10 जिल्ह्यांमधून घडतात.

टॉप 10 सायबर गुन्हे जिल्हे

आयआयटी कानपूरमधील फ्युचर क्राइम रिसर्च फाउंडेशन (FCRF) या ना-नफा स्टार्टअपने दावा केला आहे. या स्टार्टअपने आपल्या  ‘अ डीप डायव्ह इन सायबर क्राइम ट्रेंड्स इम्पॅक्टिंग इंडिया’ या संशोधनात हा दावा केला आहे. 

FCRF नुसार,  भरतपूर (18 टक्के), मथुरा (12 टक्के), नूह (11 टक्के), देवघर (10 टक्के), जामतारा (9.6 टक्के), गुरुग्राम (8.1 टक्के), अलवर (5.1 टक्के), बोकारो (2.4 टक्के), कर्मा टंड (2.4 टक्के) आणि गिरीडीह (2.3 टक्के) हे जिल्हे भारतातील सायबर गुन्ह्यांमध्ये आघाडीवर आहेत. या 10 जिल्ह्यातून एकत्रितपणे 80 टक्के सायबर गुन्हे घडतात.

नूंह पोलिसांनी केला होता गौप्यस्फोट

FCRF चे सह-संस्थापक हर्षवर्धन सिंग म्हणाले, “आमचे विश्लेषण भारतातील 10 जिल्ह्यांवर केंद्रित होते जिथे सर्वाधिक सायबर गुन्हे घडतात. "संशोधन पेपरमध्ये, या जिल्ह्यांतील सायबर गुन्ह्यांचे प्रमुख कारण समजून घेणे प्रभावी प्रतिबंध आणि निर्मूलन धोरणे तयार करण्यासाठी आवश्यक आहे."

देशातील वाढती सायबर गुन्हेगारी ही चिंतेची बाब आहे. असे फसवणूक करणारे  नवनवीन डावपेच अवलंबतात आणि लोकांना आपला बळी बनवतात. नुकतेच सायबर गुन्ह्याबाबत नूह पोलिसांनीही धक्कादायक माहिती उघड केली होती. सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या बहुतांश हॅकर्सनी बारावीपर्यंतच शिक्षण घेतल्याचे पोलिसांनी सांगितले होते, तर काही हॅकर्स निरक्षरही होते. 

आठ महिन्यात पुणेकरांनी गमावले 20 कोटीपेक्षा जास्त रुपये

पुणे (Pune News) शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. आठ महिन्यात पुणेकरांनी 20 कोटी पेक्षा जास्त रुपये गमावले आहे. पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे आत्तापर्यंत जानेवारी 2023 ते 31 ऑगस्ट या आठ महिन्यात 1114 विविध गुन्ह्यांचे अर्ज हे आले असून यात फक्त ऑनलाईन टास्क या गुन्ह्यात 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे गेल्या अनेक महिन्यात  फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र तपास अजूनही अधांतरीच दिसत आहे. केवळ तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ॲानलाईन फसवणुकीचे अर्थात फिशींग  अनेक नवीन प्रकार या सायबर चोरांनी आजमावले आहेत आणि याला सामान्य नागरीक बळी पडत आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget