Bhandara News : भंडाऱ्यातील धान खरेदी केंद्रात घोटाळ्यांचा सिलसिला सुरूच; कोट्यवधींच्या घोटाळ्यात तीन केंद्र चालकांना अटक
Bhandara : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रात चार वर्षांपूर्वी 58 हजार 890.76 क्विंटल धानाचा अपहार करण्यात आला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेनं तपासानंतर यात तीन केंद्र चालकांना अटक केली आहे.
Bhandara News भंडारा : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रात (Paddy Buying Center) चार वर्षांपूर्वी 58 हजार 890.76 क्विंटल धानाचा अपहार करण्यात आला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेनं तपासानंतर यात तीन केंद्र चालकांना अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानं केलेल्या तपासानंतर यात तीन केंद्र चालकांना अटक केली आहे. धान केंद्रात घोटाळा प्रकरणी तीन केंद्र चालकांना अटक झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या केंद्र चालकामध्ये लाखांदूर (Lakhandur) तालुक्यातील सरांडी येथील नीलेश ठाकरे आणि पिंपळगाव येथील दिनेश परशुरामकर व विनोद परशुरामकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या वर्षात धान खरेदी घोटाळा करणाऱ्यामध्ये आतापर्यंत आठ केंद्र चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धान खरेदी केंद्रात घोटाळ्यांचा सिलसिला सुरूच
भंडारा जिल्ह्यात (Bhandara News) धान खरेदी केंद्रातील घोटाळ्यांचा सिलसिला सुरूच असल्याचे बघायला मिळत आहे. नुकतेच शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाची अफरातफर केल्याप्रकरणी भंडाऱ्यात एक धान खरेदी केंद्र चालकांचा घोटाळा उघड झाला होता. यात भंडारा जिल्ह्यातील (Bhandara News) पवनी तालुक्यातील सावरला येथील आधार बहुउद्देशीय सहकारी संस्थेचा हा घोटाळा होता. 2021-2022 च्या खरीप आणि रब्बी हंगामात या संस्थेच्या अध्यक्ष आणि 11 संचालकांनी तब्बल 42 कोटी 78 लाख 864 हजार रुपयांच्या 1470.40 क्विंटल खरेदी केलेल्या धानाची अफरातफर केल्याचं चौकशीत समोर आलं आहे. या प्रकरणामुळे भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी जिल्ह्यात सहा धान खरेदी केंद्रांवर गुन्ह्यांची नोंद झाली होती.आशातच आता आणखी एक कारवाईची घटना उजेडात आली आहे.
तीन केंद्र चालकांना अटक
नुकतेच भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सावरला येथील आधार बहुउद्देशीय सहकारी संस्थेचा घोटाळा उघड झाला होता. शासन आणि फेडरेशनची फसवणुक केल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं जिल्हा मार्केटिंग अधिकारी सुधीर पाटील यांच्या तक्रारीवरून पवनी पोलीसात कलम 409, 420, 468, 471, 34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांवर शासकीय धानाची अफरातफर केल्या प्रकरणी पाच संस्थेविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशातच आता हा गैरप्रकार उजेडात आल्याने या वर्षात धान खरेदी घोटाळा करणाऱ्यामध्ये आतापर्यंत आठ केंद्र चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या