आई आहे की राक्षशीण? चार वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, बॅगेत भरलं अन्; AI कंपनीची CEO अटकेत
Karnataka-Goa Crime News: कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या महिला सीईओनं आपल्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Crime News : गोवा : कर्नाटकातील (Karnataka) घडलेल्या एका हत्याकांडानं (Bengaluru Crime News) संपूर्ण देश हादरला आहे. आई आपल्या पोटच्या मुलाला आपल्या काळजाच्या तुकड्याप्रमाणं जपते, पण कर्नाटकातील या आईनं आपल्या पोटच्या गोळ्याचीच हत्या केली आहे. आईनं उचललेल्या या टोकाच्या पावलामुळं संपूर्ण राज्य हादरलं आहे.
कर्नाटकातील चित्रदुर्ग (Chitradurga) येथे एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) कंपनीच्या महिला सीईओनं आपल्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं केवळ कर्नाटकच नाहीतर संपूर्ण देश हादरला आहे. ही महिला आपल्या मुलाचा मृतदेह पिशवीत घेऊन गोव्याहून (Goa) कर्नाटकला जात होती. मात्र, पोलिसांनी तिचा कट उधळून लावत तिला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे, महिलेला पोलिसांनी अटक केली, त्यावेळी तिच्याकडे एक मोठी बॅग होती. पोलिसांनी महिलेकडे असलेल्या बॅगेची तपासणी केली असता, त्या बॅगेत महिलेच्या 4 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेली आरोपी महिला सूचना सेठ हिचं 2010 मध्ये लग्न झालं होतं. 2019 मध्ये आरोपी मगिलेनं एका मुलाला जन्म दिला होता आणि 2020 मध्ये तिचा पतीसोबत वाद सुरू झाला. हे प्रकरण न्यायालयात गेलं, त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. मुलाच्या वडिलांना रविवारी मुलाला भेटता येईल, असे आदेश न्यायालयानं दिले होते. न्यायालयाच्या निर्देशांनंतर आरोपी महिला दबावाखाली आली. आपल्या मुलानं पतीला भेटू नये, अशी महिलेची इच्छा होती. त्यामुळे तिनं आपल्या मुलालाच संपवण्याचा निर्णय घेतला. महिलेनं कट रचला, शनिवारी मुलासह गोवा गाठलं आणि तिथे जाऊन आपल्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या केली. आपल्या मुलालाच संपवलं चर पती आपल्या मुलाला भेटूच शकणार नाही, असं त्या महिलेला वाटत होतं. त्यामुळेच महिलेनं मुलाची हत्या केली.
पोलिसांना कसा लागला सुगावा?
महिलेनं स्वतःच्या मुलाला संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे कट आखला. गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये महिला थांबली होती, त्या हॉटेलमध्ये तिने आपल्या चार वर्षांच्या मुलालाही सोबत आणलं होतं. महिला हॉटेलमधून बाहेर पडली, तेव्हा मुलगा तिच्यासोबत नव्हता. महिला एकटी जात असल्याचं पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला. महिला ज्या टॅक्सीमध्ये गेली होती, ती लोकल टॅक्सी असल्यानं हॉटेल कर्मचाऱ्यांनी टॅक्सी चालकाला फोन करून महिलेबाबत विचारणा केली. टॅक्सी चालकानं सांगितलं की, महिला टॅक्सीत एकटीच होती. यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावून याप्रकारासंदर्भात संपूर्ण माहिती दिली. पोलिसांनाही संशय आल्यानं पोलिसांनी या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महिलेला अटक करून तिच्याजवळ असलेली बॅग ताब्यात घेतली. पोलिसांनी बॅगेची झडती घेतल्यानंतर त्यात मुलाचा मृतदेह आढळून आला.
गोव्यातील कँडोलीममध्ये महिलेनं आपल्या पोटच्या मुलाला संपवलं. गोव्याचे डीजीपी जसपाल सिंह यांनी मुलाच्या हत्येप्रकरणी महिलेला अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.